Sania Mirza Shoaib Malik Divorced Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sania Mirza Shoaib Malik: पाकिस्तानी अभिनेत्रींच्या प्रेमात असल्याने शोएब मलिकचा सानिया मिर्झासोबत दुरावा

पाकिस्तानातील प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल आयशा उमरमुळे दोघांमध्ये दुरावा आल्याचे म्हटले जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sania-Shoaib Divorced Update: भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक याची सध्या बरीच चर्चा सुरू आहे.या दोघांचा घटस्फोटाची झाल्याची बातमी समोर आली आहे. परंतु शोएब आणि सानियाने यावर कोणतीही प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही. या दोघांच्या घटस्फोटाचे कारण पाकिस्तानमधील एक मॉडेल असल्याचे सांगिलते जात आहे.

सानिया आणि शोएबचा घटस्फोट झाल्याचे पाकिस्तानच्या मीडियाचे म्हणणे आहे. हे दोघे फक्त त्यांच्या मुलाचा सांभाळ करण्यासाठी एकत्र येतात अशी माहिती समोर आली आहे. इजहान मलिक मिर्झा असे त्यांच्या चार वर्षीय मुलाचे नाव आहे. नुकताच त्यांनी इजहानचा वाढदिवस साजरा केला आणि त्याचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले होते.

पाकिस्तानी मीडियानुसार सानिया आणि शोएब दुबईमधील विलामध्ये एकत्र राहत होते. परंतु सानियाने आता ते घर सोडले असून ती नवीन घरात राहायला गेली आहे. जेणेकरून ती दुबईमध्ये राहून आपल्या मुलाचा सांभाळ करू शकेल. (Divorce)

शोएबने सानियाला धोका दिल्याचे म्हटलं जात आहे. पाकिस्तानातील प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल आयशा उमरमुळे दोघांमध्ये दुरावा आल्याचे म्हटले जात आहे. शोएब आणि आयशाने एक बोल्ड पोटोशूट केले होते. त्यानंतर त्या दोघांमध्ये अफेअर सुरू झाल्याची कुणकुण सानिया लागली. त्यानंतर तिने घटस्फोटासाठी अर्ज केला आणि ते विभक्त झाल्याचे म्हटलं जात आहे. (Sania Mirza)

या फोटोशूटवर शोएब मलिकने म्हटले होते की, मी क्रिकेटर असल्याने मला मॉडेलिंगविषयी जास्त माहित नाही. परंतु आयशाने यात माझी खूप मदत केली. सानियाला याविषयी काय वाटते यावर प्रतिक्रया देत शोएब म्हणाला, सानियाने यावर काहीच रिअॅक्शन दिली नाही.

सानिया आणि शोएब यांचे १२ एप्रिल, २०१२मध्ये लग्न झाले होते. या दोघांच्या लग्नाचा पारंपरिक विवाहसोहळा हैद्राबादमध्ये पार पडला होता. त्यांच्या या लग्नाला दोन्ही देशातून बराच विरोध झाला होता. शोएबचे हे दुसरे लग्न होते. तर सानियाचा या लग्नाआधी तिच्या मित्रांसोबत ठरलेला साखरपुडा देखील मोडला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण; 5 आरोपींना मुंबई गुन्हे शाखा उद्या कोर्टात हजर करणार

Thursday Horoscope: धनलाभाचे योग अन् नात्यांत गोडवा; या ४ राशीच्या लोकांना मिळणार आनंदाची बातमी, वाचा गुरुवारचं राशीभविष्य

एकनाथ शिंदेंनी मनोज जरांगेंना 500 कोटी दिले? जरांगे आरोपांचे पुरावे देणार?

शूटर १५ तासांत जेरबंद पण मास्टरमाइंड कोण? टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील धक्कादायक सत्य समोर

दिवाळीआधीच तुकाराम मुंढेंचा धमाका, भेसळखोरांवर धडक कारवाई; कोट्यवधींचं तेल, भेसळयुक्त पदार्थांचा साठा जप्त

SCROLL FOR NEXT