Samantha Prabhu Issues Clarification On Nebuliser Saam tv
मनोरंजन बातम्या

Samantha Ruth Prabhu : "मी नशीबवान आहे इतकी महागडे औषधं घेऊ शकते..." समंथा प्रभूने सांगितला तिच्यासोबत घडलेला वाईट काळातला किस्सा

Samantha Prabhu Issues Clarification On Nebuliser : दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने २०२२ मध्ये तिला मायोसिटीस हा ऑटोइम्युन आजार असल्याचा खुलासा केला होता. अभिनेत्री आजारी असल्यापासून ती अभिनयापासून दूर आहे.

Chetan Bodke

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने २०२२ मध्ये तिला मायोसिटीस हा ऑटोइम्युन आजार असल्याचा खुलासा केला होता. त्याच वेळी तिचा ‘यशोदा’ चित्रपट रिलीज झाला होता. अभिनेत्री आजारी असल्यापासून ती अभिनयापासून दूर आहे. नुकतीच समांथाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ती आपल्या आजाराबद्दल बोलली आहे.

शेअर केलेल्या पोस्टमध्ये समंथा रुथ प्रभुने लिहिलंय की, "गेल्या काही वर्षांत माझ्या आजारपणामुळे मला अनेक प्रकारची औषधे घ्यावी लागली आहेत. मला त्या गोळ्या औषधं डॉक्टरांनी सक्तपणे घेण्याचा सल्ला दिला होता आणि मी त्या घेण्याचाही प्रयत्न केला. उच्चशिक्षित डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच मी त्या गोळ्या घेण्याचा प्रयत्न केला. यातील अनेक उपचार खूप महागडे होते. मी किती नशीबवान आहे की मी ते घेऊ शकले. इतक्या महागड्या गोळ्या औषधं जे लोकं नाही घेऊ शकत, त्यांच्याविषयी मी नेहमी विचारात असते. मी पारंपारिक उपचारांनी बरे झाली नाही. थेरपी आणि डॉक्टरांनी केलेले उपचार या दोन गोष्टींमुळेच मी आजारपणातून बरी झाले आहे."

"मी खरंतर जास्त महागडे उपचार करत नाही. पण आजार वेगळ्या पद्धतीचा असल्यामुळे या काळत मी खूप काही शिकले. आजारपणावर होत असलेल्या उपचारांमुळे अनेकांचे आर्थिक नुकसान होते आणि अनेकांना ते महागडे उपचार परवडणारे नसतात. मला एका डॉक्टरांनी पर्यायी थेरपीचा सल्ला दिला होता. " असं म्हणत तिने आपल्या आजाराबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. या लांबलचक पोस्टमध्ये तिने आपल्यावर झालेल्या उपचाराबद्दल भाष्य केले आहे.

त्यासोबतच पुढे डॉक्टरांबद्दलही तिने भाष्य केले आहे. तिच्या फॅमिली डॉक्टरांचा आणि आणखी एका डॉक्टराचाही तिने किस्सा शेअर केलेला आहे. सध्या अभिनेत्रीची इन्स्टा पोस्ट चांगलीच व्हायरल होत असून अभिनेत्रीच्या हेल्थबद्दलही चाहते विचारपूस करीत आहेत.

समंथाच्या खासगी लाईफबद्दल बोलायचं तर, नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू २०१७ मध्ये लग्नबंधनात अडकले. चार वर्षांच्या डेटिंगनंतर ते विभक्त झाले. 2021 मध्ये नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू यांनी घटस्फोट घेतला. समंथाला आपल्या आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. घटस्फोटानंतर अभिनेत्रीला मायोसिटीस नावाचा आजार झाला. पण इतकं असूनही अभिनेत्री आपल्या खासगी आयुष्यात केव्हा खचली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रूग्णवाहिकेनं मध्यरात्री घेतला पेट, नवजात बाळासह चौघांचा होरपळून मृत्यू, घटना CCTVत कैद

Maharashtra Live News Update: अंजनेरी पर्वतावर हनुमानाचे भव्य मंदिर बनवा, हनुमान जन्मस्थान संस्थेची मागणी

Eknath Shinde News : शिंदेंच्या शिवसेनेला एकाच दिवसात ३ धक्के, KDMC मधील दिग्गज नेत्यांनी केला भाजपात प्रवेश

Ladki Bahin Yojana: निवडणुकीआधी लाडक्या बहि‍णींना खुशखबर मिळणार, नोव्हेंबरचे ₹१५०० या दिवशी जमा होण्याची शक्यता

Shocking: ड्रग्ज देऊन चौघांकडून सामूहिक बलात्कार, तक्रार द्यायला गेल्यावर पोलिसांनीही अब्रु लुटली अन् ₹५००००..., थरकाप उडवणारी घटना

SCROLL FOR NEXT