Pelvic Inflammatory Disease Prevention : स्त्रियांच्या प्रजनन क्षमतेवर मात करण्यासाठी सेल बेस थेरपी करणार मदत, कसे? जाणून घ्या तज्ज्ञांकडून

Prevention Of PID Problem : ल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज म्हणजेच पीआयडी, हा एक आजार आहे जो महिलांच्या प्रजनन अवयवांवर परिणाम करते. बऱ्याचदा उपचार न केलेल्या लैंगिक संक्रमित संसर्गामुळे (STIs), पीआयडी दीर्घकालीन गुंतागुंत होऊ शकते.
Pelvic Inflammatory Disease Prevention
Pelvic Inflammatory Disease PreventionSaam Tv
Published On

PID In Women :

पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज म्हणजेच पीआयडी, हा एक आजार आहे जो महिलांच्या प्रजनन अवयवांवर परिणाम करते. बऱ्याचदा उपचार न केलेल्या लैंगिक संक्रमित संसर्गामुळे (STIs), पीआयडी दीर्घकालीन गुंतागुंत होऊ शकते, ज्यामध्ये तीव्र पेल्विक वेदना, वंध्यत्व आणि एक्टोपिक गर्भधारणेचा धोका वाढतो. अँटिबायोटिक्स सारख्या पारंपारिक उपचारांच्या जोडीला रिजनरेटिव्ह मेडिसिन्समधील झालेली प्रगती ही पीआयडीने ग्रस्त रुग्णांसाठी आशेचा किरण ठरत आहे.

पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज (पीआयडी) हा आजार महिलांच्या पुनरुत्पादक अवयवांवर परिणाम करतो. असुरक्षित लैंगिक संबंधाद्वारे या आजाराचा प्रसार होतो. यात लैंगिक संक्रमित जीवाणू योनीतून गर्भाशयात, गर्भाशय मुख, फॅलोपियन ट्यूब आणि अंडाशयात पसरतात आणि हा आजार बळावतो. यामुळे प्रजनन क्षमता आणि एकूणच पुनरुत्पादक आरोग्यावर (Health) परिणाम होतो.

रीजनरेटिव्ह मेडिसिनचे फायदे

रीजनरेटिव्ह मेडिसिन हे शरीराच्या नैसर्गिक उपचार प्रक्रियेचा उपयोग करून खराब झालेल्या पेशींना दुरुस्त करण्यासाठी आणि त्यांच्या कार्याला चालना देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण भुमिका बजावते. पीआयडीच्या सारख्या आजाराच्या बाबतीत पेशींचे नुकसान आणि दाह झाल्यामुळे त्यावर येणाऱ्या डागांवर उपाय करणे आहे.

स्टेम सेल थेरपी हे प्रभावित पुनरुत्पादक अवयवांची दुरुस्ती आणि नव्याने तयार करण्याची क्षमता निर्माण करतात तसेच प्रजनन क्षमता (Fertility) पुनर्संचयित करतात आणि तीव्र ओटीपोटातील वेदना देखील कमी करतात. लवकरच गोळ्यांऐवजी स्टेम सेल्स थेरेपी वापरली जाईल असे डॉ. प्रदीप महाजन यांनी स्पष्ट केले.

या औषधामध्ये ऍडिपोज टिश्यू (चरबीयुक्त पेशी) किंवा अस्थिमज्जा यांसारख्या विविध स्त्रोतांकडून प्राप्त झालेल्या स्टेम पेशींचा वापर केला जातो. या स्टेम पेशी नंतर प्रभावित भागात आणल्या जातात, जिथे ते उपचार आणि ऊतकांच्या पुनरुत्पादनास मदत देतात. ही प्रक्रिया शरीराला स्वतःला बरे होण्यास प्रोत्साहित करते, केवळ लक्षणेच नाही तर या स्थितीची मूळ कारणे देखील लक्ष्य करते अशी प्रतिक्रिया डॉ. पल्लवी लाळे यांनी व्यक्त केली.

पेल्विक इन्फ्लॅमेटरी डिसीजचा स्त्रीच्या प्रजनन आरोग्यावर खोलवर आणि कायमचा परिणाम होऊ शकतो. पुनरुत्पादक औषधांमधील प्रगती ही पीआयडीच्या उपचारात संभाव्य बदल घडवून आणण्यास नक्कीच फायदेशीर ठरेल, केवळ संसर्गच नाही तर पेशींचे नुकसान देखील दूर करता येते ज्यामुळे दीर्घकालीन गुंतागुंत होऊ शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com