Samantha Prabhu And Raj Nidimoru Relationship Saam Tv
मनोरंजन बातम्या

Samantha Prabhu : नागा चैतन्यच्या साखरपुड्यानंतर आता समंथाही प्रेमात पडली ? करतेय प्रसिद्ध दिग्दर्शकाला डेट

Samantha Prabhu And Raj Nidimoru Relationship : नागा चैतन्यच्या साखरपुड्यानंतर आता समांथानेही आयुष्याच्या नव्या इनिंगची सुरुवात करणार असल्याची चर्चा आहे. समांथाचं नाव एका दिग्दर्शकासोबत जोडले जात आहे.

Chetan Bodke

टॉलिवूड अभिनेत्री समांथा रुथ प्रभू गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. नागा चैतन्य आणि समांथाने २०१७ मध्ये एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली होती. पण, लग्नाच्या चार वर्षांनंतर दोघांमध्येही मतभेद सुरू झाले. त्यामुळे नागा चैतन्य आणि समांथा ऑक्टोबर २०२१ मध्ये वेगळे झाले.

नागा चैतन्यचा आणि समांथाचा घटस्फोट झाल्यानंतर अभिनेता शोभिताला डेट करू लागला. शोभिता आणि नागा चैतन्यने गेल्या काही दिवसांपूर्वीच साखरपुडा केला. त्यानंतर आता समांथाही आपल्या आयुष्याच्या नव्या इनिंगची सुरुवात करणार असल्याची चर्चा आहे. समांथाचं नाव एका दिग्दर्शकासोबत जोडले जात आहे.

बॉलिवूड लाईफच्या वृत्तानुसार, समांथा रुथ प्रभू ही दिग्दर्शक राज निदिमोरूला (Raj Nidimoru) डेट करत असल्याची चर्चा सुरू आहे. दोघेही गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांच्या प्रेमात असल्याच्या बातम्या येत आहेत. समांथा आणि राजने 'द फॅमिली शो २'मध्ये एकत्र काम केले होते. समांथाने 'द फॅमिली शो २'च्या माध्यमातून ओटीटी विश्वात डेब्यू केले होते. आता त्यानंतर अभिनेत्री 'सीटाडेल' वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. राज यांनी डीकेसोबत 'द फॅमिली मॅन २'चे दिग्दर्शन केले.

समांथा आणि राज या दोघांनी दोन ओटीटी प्रोजेक्टमध्ये काम केले आहे. मिडिया रिपोर्टनुसार, राज निदिमोरूचेही पहिले लग्न झालेले आहे. पण तरीही तो समांथाच्या प्रेमात बुडाला आहे. मात्र, राज आणि समांथा यांच्या डेटिंगच्या वृत्तात किती तथ्य आहे, याला दुजोरा देणारे कोणतेही वृत्त समोर आले नाही. या दोघांनीदेखील डेटिंगबाबत, रिलेशनशिपच्या वृत्तावर कोणतेही भाष्य केले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fashion Tips: कमी खर्चातही दिसाल एकदम क्लासी! ऑफिस किंवा समारंभात 'या' ७ स्टायलिंग टिप्सने मिळेल ग्लॅमरस लूक

Maharashtra News Live Update: वसई-विरारमध्ये गणेश विसर्जनावरून तणाव! तलावाचा गेट तोडून ग्रामस्थांनी केले गणरायाचे विसर्जन

Milk Tea : सकाळी उठताच दुधाचा चहा पिताय? सावधान! सवय पडेल महागात, ५ गंभीर दुष्परिणाम एकदा वाचा

Lockdown : भारताच्या शेजारील देशात लॉकडाऊन, रात्री ८ नंतर सर्वकाही बंद; नेमकं कारण काय?

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगार-पेन्शनबाबत मोठ्या मागण्या; 3.84 फिटमेंट फॅक्टरसह 5 वर्षांनी रिव्हिजनचा प्रस्ताव

SCROLL FOR NEXT