Johnny Lever: कॉमेडीचं भन्नाट टायमिंग आणि अफलातून अभिनयाच्या जोरावर जॉनी लिव्हर आजही प्रेक्षकांच्या मनोरंजन करत आहे. आयुष्यात कितीही चढउतार आले तरी ते डगमगले नाहीत. अन् अवघं जगं जिंकून घेतल्याप्रमाणे आजही साऱ्यांच्या मनावर राज्य करतोय. जॉनी लिव्हरचा जन्म १४ ऑगस्ट १९५७ रोजी आंध्र प्रदेशातील कानिगिरी येथे झाला. जॉनी लिव्हर आज आपल्या फॅमिलीसोबत ६७ वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहे. अभिनेत्याच्या वाढिदवसानिमित्त त्याच्याबद्दल काही रंजक किस्से जाणून घेऊया...
बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकारांच्या यादीत चाहते अभिनेता जॉनी लिव्हरचं नाव आवर्जून घेतात. अभिनेत्याने ९० च्या दशकात आपल्या कॉमेडी स्वभावाच्या जोरावर प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले. अभिनेत्याला बालपणापासूनच चित्रपट पाहण्याची आणि चित्रपटांमध्ये काम करण्याची आवड होती. बालपणी जॉनीने रस्त्यावर काम विकण्याचे काम केले होते. यावेळी अभिनेत्याने प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी मिमिक्री करत पेन विकण्याचे काम केले.
अगदी लहाणांपासून थोऱ्या मोठ्यांपर्यंत सर्वच वयोगटातील लोकांना जॉनी लिव्हरची कॉमेडी आवडते. ६७ वर्षीय अभिनेत्याचं खरं नाव जॉनी लिव्हर नाही. अभिनेत्याचं खरं नाव जॉन प्रकाश राव जनुमाला असं आहे. हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवण्यापूर्वीच अभिनेत्याने आपले नाव बदलले. ‘हिंदुस्थान लिव्हर’ कंपनीच्या नावावरून जॉनी यांचे नाव पडलं आहे. या कंपनीमध्ये अभिनेत्याचे वडील नोकरीला होते.
त्यामुळे अभिनेता अनेकदा आपल्या वडिलांसोबत ऑफिसला यायचा. त्यासोबतच वडिलांच्या ऑफिसमध्ये काही कार्यक्रमादरम्यान जॉनीने अनेकदा चित्रपट कलाकारांची नक्कल करत आणि लोकांना खूप हसवायचा. त्यामुळे लोक त्यांना जॉनी लिव्हर म्हणू लागले. पुढे जाऊन त्यांनी याच नावाने बॉलिवूड मध्ये एन्ट्री केली. असा अभिनेत्याच्या नावाचा रंजक किस्सा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.