Sam Bahadur- Animal 2nd Day Box Office Collection Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sam Bahadur- Animal 2nd Day Collection: सलग दुसऱ्या दिवशीही ‘ॲनिमल’ने मारली बाजी, विक्की कौशलच्या ‘सॅम बहादुर’ने केली फक्त इतकी कमाई

Sam Bahadur- Animal Box Office Collection: दोन आघाडीच्या कलाकारांचे बॉक्स ऑफिसवर चित्रपट रिलीज झालेय म्हटल्यावर चाहत्यांना कोण सर्वाधिक कमाई करणार याची उत्सुकता लागली.

Chetan Bodke

Sam Bahadur- Animal 2nd Day Box Office Collection

१ डिसेंबरला बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी दोन चित्रपट रिलीज झाले आहेत. दोन आघाडीच्या कलाकारांचे बॉक्स ऑफिसवर चित्रपट रिलीज झालेय म्हटल्यावर चाहत्यांना कोण सर्वाधिक कमाई करणार याची उत्सुकता लागली. शुक्रवारी म्हणजेच १ डिसेंबरला बॉक्स ऑफिसवर रणबीर कपूरचा अ‍ॅनिमल आणि दुसरा विक्की कौशलचा सॅम बहादुर रिलीज झाला आहे. हे दोन्हीही चित्रपट वेगवेगळ्या धाटणीचे आहेत. सध्या प्रेक्षकांना कोणता चित्रपट सर्वाधिक कमाई करणार याची उत्सुकता लागली आहे. कोणत्या चित्रपटाने सर्वाधिक कमाई केली आहे, जाणून घेऊया...

संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘ॲनिमल’ चित्रपटाने पहिल्या दिवशी ६१ कोटींची कमाई तर दुसऱ्या दिवशी चित्रपटाने ६६ कोटींची कमाई केली आहे. तब्बल १०० कोटींमध्ये निर्मित झालेल्या ‘ॲनिमल’ चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट दुसऱ्या दिवशीच १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला असून चित्रपटाला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

उत्तम कथा, दर्जेदार व्हिएफएक्स आणि कलाकारांचा अभिनय असा हटके मिलाप आपल्याला ‘ॲनिमल’ चित्रपटामध्ये दिसत आहे. ‘ॲनिमल’मध्ये प्रमुख भूमिकेत रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर, बॉबी देओल आहेत.

‘ॲनिमल’ एकूण भाषांमध्ये रिलीज झाला आहे. एकट्या हिंदी भाषेत चित्रपटाने ५० कमावले आहे. पठान, गदर २ आणि टाइगर ३चे रेकॉर्ड मोडत ओपनिंगला सर्वाधिक कमाई करणारा ‘ॲनिमल’ बॉलिवूड चित्रपट ठरला आहे.

मेघना गुलजार दिग्दर्शित ‘सॅम बहादुर’ला सोशल मीडियावर संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पण जरीही असं असलं तरी, ‘ॲनिमल’च्या समोर ‘सॅम बहादूर’ इतकी खास कमाई करताना दिसत नाही. खूपच कमी कमाई या चित्रपटाची आहे. चित्रपटाने आतापर्यंत एकूण १५.५० कोटींचा टप्पा गाठला आहे.

५५ कोटींमध्ये निर्मित झालेल्या ह्या चित्रपटासाठी दिग्दर्शकांसह निर्मात्यांनीही विशेष मेहनत घेतली आहे. भारताचे पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशा यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची कथा आहे. चित्रपटामध्ये विकी कौशल सह फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, नीरज काबी सारखे प्रतिभावान कलाकार चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT