Battle Of Galwan New Title Saam Tv
मनोरंजन बातम्या

Battle Of Galwan New Title: 'बॅटल ऑफ गलवान'चं नाव बदललं; सलमान खानचा चित्रपट आता 'या' नावाने होणार प्रदर्शित

Battle Of Galwan New Title: सलमान खानच्या बहुप्रतिक्षित 'बॅटल ऑफ गलवान' (Battle of Galwan) या चित्रपटाचे शीर्षक बदलण्यात आले आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या साधारण महिनाभर आधीच, निर्मात्यांनी या चित्रपटाचे नाव बदलले आहे.

Shruti Vilas Kadam

Battle Of Galwan New Title: बॉलीवूडचा भाईजान सलमान खानच्या २०२६ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या बॅटल ऑफ गलवान या चित्रपटाचे टायटल बदलण्यात आले आहे. सलमान खानने नवीन टायटससह एक नवीन पोस्टर शेअर केले आहे. चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना या सलमाने घोषणा केली की, हा चित्रपट आता जगभरातील चित्रपटगृहांमध्ये मातृभूमि: मे वॉर रेस्ट इन पीस या टायटलने प्रदर्शित होईल.

टायटल का बदलण्यात आले?

बॅटल ऑफ गलवान या टायटलमुळे असा समज निर्माण होत होता की चित्रपटाची कथा केवळ गलवान खोऱ्यात घडलेल्या संघर्षापुरतीच मर्यादित आहे. २०२० मधील भारत-चीन चकमकीचे चित्रण करण्यासोबतच, हा चित्रपट भारतीय सैनिकांचा वैयक्तिक संघर्ष आणि त्यांच्या कुटुंबांनी दिलेल्या बलिदान मांडतो. याच कारणामुळे चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटाचे शीर्षक बदलण्याचा निर्णय घेतला. तसेच, मातृभूमी या शब्दाचा उच्चार केल्यानेही मनात देशभक्तीची एक गहन भावना जागृत होते. शिवाय, हा चित्रपट युद्धापेक्षा शांततेचा पुरस्कार करतो. याच कारणामुळे या चित्रपटाला मातृभूमि: मे वॉर रेस्ट इन पीस असे टायटल देण्यात आले आहे.

चीनमधील वाद

या महिन्याच्या सुरुवातीलाच चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी असा आरोप केला होता की, या चित्रपटात ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड करण्यात आली आहे. चीनने या चित्रपटाला "चीन-विरोधी" भावना भडकवण्याचा एक प्रयत्न असे संबोधले होते.

चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख

हा चित्रपट १७ एप्रिल रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता. परिणामी, चित्रपटातील अनेक गाणी आणि त्याचा टीझर यापूर्वीच प्रदर्शित करण्यात आले होते. मात्र, जेव्हा अक्षय कुमारने आपला चित्रपट भूत बंगला हा १० एप्रिल रोजी प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली, तेव्हा सलमान खानच्या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आल्याची बातमी समोर आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actress: 'बायबल के बारे में बात करनी…'; बोरवलीच्या बाजारात अभिनेत्रीसोबत घडला संशयास्पद प्रकार, VIDEO व्हायरल

Rain Alert : उत्तर प्रदेशला अवकाळी पावसाचा तडाखा! वीज कोसळल्याने २४ जणांचा मृत्यू

Maharashtra News Live Update : मिसिंग लिकंवरील बोगद्याची गिनीज बूकमध्ये नोंद

Moringa Leaves Chutney Recipe: कडू वाटली तरी पौष्टिक! उन्हाळ्यात सोप्या पद्धतीने बनवा शेवग्याच्या पानांची झणझणीत चटणी

जत्रेला जाणाऱ्या भक्तांवर काळाचा घाला; भरधाव वाहन ७०० मीटर खोल दरीत कोसळलं, २० जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT