Salman Khan  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Salman Khan : 3,225 कोटींचा मालक अन् पायात फाटके बूट; सलमान खानची अवस्था पाहून चाहते चक्रावले, VIDEO होतोय व्हायरल

Salman Khan Wore Torn Shoes : सलमान खानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात तो फाटलेले बूट घालून दिसत आहे. ज्याची किंमत लाखांच्या घरात आहे.

Shreya Maskar

सलमान खान आपल्या स्टाइलमुळे चर्चेत आला आहे.

सलमान खानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात तो फाटलेल्या बुटांमध्ये दिसत आहे.

सलमान खानच्या फाटलेल्या बुटांची किंमत लाखोंमध्ये आहे.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान कायम त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिला आहे. त्याच्या बिनधास्त स्टाइलचे चाहते दिवाने आहेत. अलिकडेच सलमान खान साध्या टी-शर्ट आणि जीन्समध्ये दिसला. त्याचा लूक खूपच भारी होता. मात्र त्याच्या पायातील बूटांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या पायात फाटलेले आणि जून शूज दिसले. ज्यामुळे नेटकऱ्यांनी सलमान खानला खूप ट्रोल केले.

व्हिडीओ व्हायरल होताच नेटकरी तुफान कमेंट करत आहेत. काही जण याला सलमानचा साधेपणा म्हणत आहेत, तर काही जण निष्काळजीपणा. पण या फाटलेल्या बूटांची किंमत लाखांच्या घरात आहे. सलमान खान एका कार्यक्रमात अगदी कॅज्युअल लूकमध्ये गेला. त्याने चेकर्ड काळा शर्ट आणि जीन्स घातली होती. त्याच्या हातावर त्याचे सिग्नेचर 'लकी चार्म' ब्रेसलेटही दिसत होते. पापाराझींसाठी भाईजानने पोज दिल्या.

व्हायरल व्हिडीओत बुटांचे चामडे पुढच्या बाजूने फाटलेले दिसत आहे आणि एका बुटाला तर मोठे छिद्रही पडले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खानच्या वडिलांनी त्याला हे शूज अनेक वर्षांपूर्वी भेट दिले होते. यापूर्वी, 'टायगर ३' च्या प्रमोशन दरम्यान सलमान खान फाटलेले शूज घातलेला दिसला होता. तेव्हाही त्याचे फोटो व्हायरल झाले होते. कार्यक्रमात सलमानसोबत उपस्थित असलेल्या पत्रकारांनी खुलासा केला की, हे शूज फाटलेले नसून, एका आंतरराष्ट्रीय लक्झरी ब्रँडचे महागडे शूज आहेत. ही एक स्टाइल आहे.

सलमान खानच्या फाटलेल्या बुटांची किंमत किती?

मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खानचे फाटलेले शूज हे डिझायनर आहेत. हे बूट बालेंसियागा (Balenciaga) कंपनीचे 'Distressed Leather Cowboy Boots' आहेत. हे बूट 'डिस्ट्रेस्ड लूक' (Distressed Look) या फॅशन प्रकारातील आहेत. या बुटांची किंमत साधारणपणे १.२० लाख ते १.५० लाख रुपयांच्या दरम्यान असल्याचे सांगितले जाते. NDTV च्या रिपोर्टनुसार, सलमान खान संपत्ती 2,900 ते 3,225 कोटी रुपये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेस नेत्यावर गोळीबार; 6-7 गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोलारांनी काढला पळ

Maharashtra News Live Update: शिवसेनेकडून आमदार बच्चू कडू यांच्याकडे मोठी जबाबदारी

Karjat Tourism : धुक्याच्या सरींमध्ये हरवलेले हिल स्टेशन, कर्जतजवळील 'हे' ठिकाण सुंदर वीकेंड डेस्टिनेशन

Weight Loss: वजन वाढलयं तरी योगा किंवा एक्सरसाईज करायला आळसपणा करताय? मग होऊ शकतात हे गंभीर त्रास

भाडेपट्ट्याने शेतजमीन करणाऱ्या शेतकऱ्यांना पीककर्ज मिळेल का? जाणून घ्या नियम

SCROLL FOR NEXT