Salman Khan Dance With Marathi Actor Saam tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan Video: 'भाईजान'च्या समोर नाचणारा हा चिमुकला आहे मराठी चित्रपटसृष्टीचा प्रसिद्ध अभिनेता, तुम्हाला माहिती आहे का?

Salman Khan Dance With Marathi Actor: मराठी चित्रपटसृष्टीतील एका प्रसिद्ध अभिनेत्याला त्याच्या बालपणी सुपरस्टार सलमान खानसोबत डान्स परफॉर्मस करण्याची संधी मिळाली होती.

Priya More

Pushkar Jog With Salman Khan:

बॉलिवूडचा (Bollywood) 'भाईजान' अर्थात अभिनेता सलमान खानसोबत (Actor Salman Khan) काम करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. अनेक मराठी कलाकार देखील सलमान खानसोबत काम करायची इच्छा असल्याचे अनेकदा बोलून दाखवतात. या कलाकारांची इच्छा पूर्ण होवो वा न होवो पण मराठी चित्रपटसृष्टीतील एका प्रसिद्ध अभिनेत्याला त्याच्या बालपणी सुपरस्टार सलमान खानसोबत डान्स परफॉर्मस करण्याची संधी मिळाली होती. या मराठी अभिनेत्याचा व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत राहिला. हा मराठी अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून पुष्कर जोग (Actor Pushkar Jog) आहे.

पुष्कर जोगने अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. पुष्कर जोग हा उत्कृष्ट अभिनेत्यासोबत उत्कृष्ट डान्सर देखील आहे. त्याला लहानपणापासूनच डान्सची आवड आहे. तो आपल्या चित्रपटांमध्ये नृत्याचे कौशल्य दाखवत असतो. पुष्कर जोगने अनेक पुरस्कार सोहळ्यामध्ये आपल्या डान्सचा जलवा दाखवला आहे. लहान असताना त्याने सलमान खानसमोर जबरदस्त डान्स परफॉर्मन्स केला होता. स्वत: पुष्करने हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत सलमान खानला वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

पुष्कर जोग सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो आपल्या आयुष्यातील घडामोडी, चित्रपट त्याचसोबत नवीन प्रोजेक्टविषयीची माहिती चाहत्यांना देत असतो. अनेकदा तो आपल्या आयुष्यातील जुन्या आठवणींना देखील उजाळा देत असतो. त्याने लहानपणी सलमान खानसोबत डान्स करतानाचा व्हिडिओ इन्स्टावर पोस्ट केला होता. त्याच्या या व्हिडिओला चाहत्यांकडून खूप चांगली पसंती मिळाली होती.

आता सारखाच पुष्कर लहानपणीही खूपच क्यूट दिसायचा. ज्यावेळी सलमान खानसोबत डान्स करतानाचा त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाला होता तेव्हा अनेकांच्या नजरा चिमुकल्या पुष्करवरच होत्या. हा डान्स करणारा चिमुकला कोण? असा प्रश्न अनेकांना पडला होता. पुष्करचा तेव्हाचा तो क्यूटनेस आणि त्याचा उत्तम डान्स पाहून सर्वजण त्यांच्या प्रेमात पडले होते. त्याचा तो निरागसपणा प्रत्येकाला आवडला होता. विशेष म्हणजे सलमान खानने पुष्करला उचलून घेत त्याच्यासोबत डान्स केला होता. त्याच्या डान्सच्या एक एक स्टेप्स पाहून सलमाननेही आश्चर्य व्यक्त केले होते. पुष्करसारख्या डान्सच्या स्ट्रेप करण्याचा सलमान खाननेही प्रयत्न केल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

SCROLL FOR NEXT