Tiger 3 Trailer Date News Instagram
मनोरंजन बातम्या

Tiger 3 Trailer Date Announcement: टीझरनंतर आता ट्रेलर येणार,‘टायगर ३’च्या बहुचर्चित ट्रेलरच्या प्रदर्शनाची तारीख आली समोर

Tiger 3 Trailer Update: ‘टायगर ३’च्या टीझरनंतर आता प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपटाचा ट्रेलर येणार आहे. नुकतंच निर्मात्यांनी ट्रेलरच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.

Chetan Bodke

Tiger 3 Trailer Date News

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या ‘टायगर ३’ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. आता त्या टीझरनंतर प्रेक्षकांच्या भेटीला ट्रेलर येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत राहिलेल्या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला ‘टायगरचा मेसेज’ आला होता. त्यासोबतच त्या व्हिडीओत टायगरचा नवा लूक सुद्धा पाहायला मिळाला होता. दरम्यान, टायगरच्या त्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधले होते. आता त्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटाचा एक पोस्टर शेअर करत, ट्रेलरची तारीख शेअर केली आहे. सोबतच यावेळी निर्मात्यांनी सलमानच्या चाहत्यांसोबत चित्रपटाच्या ट्रेलरची तारीखही शेअर केली आहे.

निर्मात्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये चित्रपटाच्या ट्रेलरची तारीख १६ ऑक्टोबर देण्यात आली आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये सलमानच्या हातात बंदूक आहे, तो या फोटोमध्ये सावधरित्या उभा राहिलेला दिसून येत आहे. सध्या सलमान खानचा हा लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. टीझरप्रमाणेच सोशल मीडियावर ट्रेलरचीही प्रचंड चर्चा होताना दिसत आहे. आतापर्यंत प्रेक्षकांच्या समोर कतरिनाचा आणि सलमानचाच लूक समोर आला आहे. पण व्हिलनच्या भूमिकेत असलेल्या इम्रान हाश्मिला पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

चित्रपटाबद्दल सांगायचे तर, चित्रपट येत्या १० नोव्हेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘एक था टायगर’चा हा ट्रायोलॉजी (तिसरा भाग) आहे. पहिला भाग ‘एक था टायगर’, दुसरा भाग ‘टायगर झिंदा हैं’ हे चित्रपट होते. त्याचा तिसरा भाग म्हणजे ‘टायगर ३’ आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. हा चित्रपट यश राज फिल्म्सचा ‘स्पाय युनिव्हर्स’चा भाग असून चित्रपटामध्ये सलमान खान, कतरिना कैफ आणि इम्रान हाश्मी सु्द्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजपचे "ऑपरेशन लोटस" 2.0, झेडपी निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये जाणार

World Widest Tunnel: मुंबई-पुणे प्रवास होणार सुसाट, जगातील सर्वात रुंद बोगदा आतून कसा आहे? पाहा VIDEO

Hair Steam Therapy : तुम्हालाही केस मजबूत हवे आहेत? मग दरोरोज केसांना घरच्या घरी द्या स्टीम थेरेपी

Gulachi Poli Recipe: गूळ न विरघळता परफेक्ट गुळाची पोळी कशी बनवायची? पाहा स्टेप-बाय-स्टेप रेसिपी

Malegaon: मालेगावमध्ये MIM च्या उमेदवारावर मध्यरात्री जीवघेणा हल्ला

SCROLL FOR NEXT