Salman Khan Sister SAAM TV
मनोरंजन बातम्या

Salman Khan Sister : सलमानच्या बहिणीनं मुंबईतला आलिशान फ्लॅट विकला, किती कोटींमध्ये डील अन् नफा काय?

Arpita Khan : सलमान खानची बहीण अर्पिता खान शर्माने आपला मुंबईतला फ्लॅट विकला आहे. हा फ्लॅट तिने कितीला विकला आणि किती नफा झाला जाणून घ्या.

Shreya Maskar

बॉलिवूडचा भाईजान म्हणजे सलमान खान (Salman Khan ) सध्या बिश्नोईच्या प्रकरणामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. बाबा सिद्दीकींच्या निधनानंतर आता बिश्नोई गँगने सलमान खानला धमकी दिली आहे. त्यामुळे सलमानच्या घरात टेन्शन वातावरण पाहायला मिळत आहे. अशात आता सलमानची बहिण अर्पिता खान शर्मा देखील चर्चेत आली आहे.

अर्पिताने (Arpita Khan) मुंबईतील तिचा आलिशान फ्लॅट विकला आहे. मुंबईतील खार परिसरात टॉवर मधले तिचा हा फ्लॅट होता. अर्पिताने हा फ्लॅट 22 कोटी रुपयांना विकला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, घराचा करार नवरात्रीत झाला आहे. त्यांचे हे डुप्लेक्स अपार्टमेंट होते. सिनेवाइज कंपनीला अर्पिताने हे अपार्टमेंट विकले आहे.

आता आयुष शर्मा आणि अर्पिता खान नवीन घरात शिफ्ट होणार असल्याचे बोले जात आहे. त्यांनी वरळी येथे नवीन फ्लॅट विकत घेतला आहे. मात्र याची अजूनही कोणती अधिकृत माहिती समोर आली नाही. आयुष शर्मा आणि अर्पिता खानने 2022मध्ये हे घर खरेदी केले होते. अवघ्या दोन वर्षातच त्यांनी हे घर विकले आहे. अद्याप त्यांनी हे घर का विकले याचा खुलासा झाला नाही आहे. सलमान खानला मिळणाऱ्या धमक्यांसोबत अर्पिताच्या घर विकण्याशी नेटकरी कनेक्शन जोडत आहे. अर्पिताच्या या फ्लॅटची किंमत 2022 मध्ये 10 कोटी होती. तर आता 2024 मध्ये अर्पिताने हा फ्लॅट तब्बल 22 कोटी रुपयांना विकला. यामुळे आयुष शर्मा आणि अर्पिता खान यांना 12 कोटींचा नफा झाला असल्याचे बोले जात आहे.

आयुष शर्मा आणि अर्पिता खान हे 2014 लग्नबंधनात अडकले. त्यांना दोन मुलं आहेत. भावासाठी अर्पिताही टेन्शन मध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT