Bigg Boss 18 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 18: अविनाश मिश्रानं बिग बॉसच्या घराला ठोकला रामराम

Avinash Mishra : 'बिग बॉस 18'च्या घरातून आतापर्यंत दोन सदस्य बाहेर गेले आहेत. नुकतेच शोचे तिसरे एलिमिनेशन पार पडले आहे. बिग बॉसच्या घरातून अविनाश मिश्राने निरोप घेतला आहे.

Shreya Maskar

सलमान खानचा शो 'बिग बॉस 18' (Bigg Boss 18) सध्या ग्रँड फिनाले पार पडत आहे. बिग बॉसच्या 100 दिवसांच्या प्रवासात घरात अनेक सदस्यांची नाती जुळतात. काहींचे प्रेमाचे, काहींचे मैत्रीचे तर काही लोकांचे येथे शत्रूही होतात. 'बिग बॉस 18' हा सीझन 6 ऑक्टोबरपासून सुरू झाला. हा शोला आता तीन महिने झाले आहेत.

'बिग बॉस 18'मध्ये सुरुवातीला 18 सदस्यांनी घरात प्रवेश केला होता. त्यानंतर बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून घरात पाच सदस्यांची एन्ट्री करण्यात आली. आतापर्यंत बिग बॉसच्या घरातून ईशा सिंह आणि चुम दरांग या सदस्यांनी घराचा निरोप घेतला असून आता बिग बॉसच्या घरातून अविनाश मिश्राने (Avinash Mishra ) एक्झिट झाली आहे.

टॉप 3 कोण?

  1. विवियन डिसेना

  2. करणवीर मेहरा

  3. रजत दलाल

बिग बॉसच्या घरात अविनाश मिश्राची अनेक रूप पाहायला मिळाली. त्याची घरात अनेक वेळा भांडणे देखील झाली. मात्र सुरूवातीपासून तो ईशासोबत राहिला. सलमान खानने वेळोवेळी 'वीकेंड का वार'मध्ये अविनाशला त्याच्यातील चुका दाखवल्या आणि अविनाशने आपल्या खेळामध्ये तसे बदलही केले. घरात अविनाशने आपल्या गाण्याने सर्वांना वेड लावले.

अविनाशने ईशा व्यतिरिक्त बिग बॉसच्या घरात विवियन डिसेना आणि करणवीर मेहराशी चांगली मैत्री केली. अविनाश कायमच आपल्या धमाकेदार गेमसाठी ओळखला गेला आहे. आता 'बिग बॉस 18'च्या घरात तीन सदस्य उरले आहेत. यातील कोणत्या सदस्याचा प्रवास येथे थांबणार आणि शेवटी ट्रॉफी कोण उचलणार, हे जाणून घेण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Neck Pain Relief: मोबाईल आणि लॅपटॉपच्या अतिवापरामुळे तुमचीही मान दुखतेय? 'या' 5 सवयी आजपासून बदला

Panvel Tourism : पनवेलमध्ये लपलाय निसर्ग सौंदर्याचा खजिना, वीकेंडला लोकल ट्रेन पकडा अन् थेट 'या' स्पॉटवर पोहचा

राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं, VIDEO

Maharashtra Live News Update : आरक्षण बचाव समिती आक्रमक; वर्गवारी थांबवण्यासाठी 8 एप्रिलला कल्याणमध्ये मोर्चा

DC vs MI Result : एकटा रिझवी भिडला, नडला! दिल्लीचा दणदणीत विजय; मुंबई इंडियन्सची सर्वात कमकुवत बाजू आली समोर

SCROLL FOR NEXT