'बिग बॉस 18' (Bigg Boss 18') दिवसेंदिवस अधिक मनोरंजक होत जात आहे. प्रत्येक टास्कमध्ये मोठी भांडणे होताना पाहायला मिळत आहेत. नुकताच घरात 'टाइम गॉड'चा टास्क पार पडला. यात देखील मोठी भांडणे पाहायला मिळाली.
बिग बॉसने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, करणवीर मेहरा आणि सारा खान मध्ये मोठे भांडण होते. शेवटी सारा रागात येऊन करणवीर मेहराच्या तोंडावर पाणी फेकते. करणवीर मेहरा आणि सारा खानमध्ये जेवणावरून मोठा वाद होतो. करणवीर मेहरा आणि सारा खान गार्डन एरियामध्ये बसलेले असतात.
करणवीर साराला (Karan Veer Mehra) बोलतो की, "काल रात्री जेवण बनवण्याची तुझी ड्युटी होती तर तू मला विचारलस का जेवण काय बनवू म्हणून. कारण जर टाइम गॉड आहे तर त्याला विचारल पाहिजे. जर नसता तर तुम्हाला हव ते बनवा." त्यानंतर सारा त्याच्यावर चिडते कारण करणवीर मेहरा खोटं बोलून खिचडी घेतो. त्यामुळे ती शिव्याही देते आणि करणवीर मेहरा विषयी खूप वाईट बोलू लागते. त्यावर करणवीर बोलतो की, "आता तू केस ओढू शकत नाही...शिवीगाळ करू शकत नाही नाही...कारण तुझे हे नाटक नॉमिनेशन वेळी झाले आहे." असे बोलताच साराला (Sara Khan) राग येतो. ती टेबलवर असलेली भरलेली पाण्याची बाटली उघडते आणि करणवीर मेहराच्या तोंडावर टाकते. तेव्हा चाहत आणि अविनाश साराला थांबवण्याचा प्रयत्न करतात.
आता बिग बॉसच्या घरात या आठवड्यात टाइम गॉड कोण होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. तसेच या 'वीकेंड का वार' मध्ये भाईजान सलमान खान कोणाची शाळा घेणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.