Bigg Boss 18' SAAM TV
मनोरंजन बातम्या

'Bigg Boss 18' च्या घरातून 'या' सदस्याचा पत्ता कट, बिग बॉसची भविष्यवाणी ठरली खोटी

Alice Kaushik: बिग बॉसचा गेम दिवसेंदिवस मनोरंजक होत जात आहे. आता बिग बॉसच्या घरातून एलिस कौशिक बाहेर पडली आहे.

Shreya Maskar

बिग बॉस (Bigg Boss 18) दिवसेंदिवस अधिक मनोरंजक होत जात आहे. रोज घरात एक नवीन राडा पाहायला मिळत आहे. सध्या घराचा 'टाइम गॉड' दिग्विजय सिंह राठी बनला आहे. त्याच्या 'टाइम गॉड' होण्यामुळे घरातील अनेक सदस्य नाराज आहेत. विवियन आणि अविनाशने यावरून घरात अनेक वेळा राडा देखील घातला आहे.

वाइल्ड कार्ड सदस्य दिग्विजय सिंह राठी घरात आल्यापासूनच धुमाकूळ घालताना पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या घरातून या आठवड्यात बाहेर जाण्यासाठी सात सदस्य नॉमिनेट झाले होते. यात करणवीर, विवियन, दिग्विजय, अविनाश, चाहत, कशिश आणि एलिस यांचा समावेश होता. या आठवड्यात एलिस कौशिक (Alice Kaushik) बिग बॉसच्या घरातून बाहेर गेली आहे. तिच्या जाण्यामुळे अनेकांना वाईट वाटले आहे.

'टाइम गॉड' दिग्विजयला कशिशला सुरक्षित करण्याचा विशेष अधिकार देण्यात आला होता. मात्र त्याने त्याचा वापर न करता कशिशला नॉमिनेशनमध्ये ठेवेल. विवियन आणि एलिस टॉप-२ मध्ये दिसणार असल्याची भविष्यवाणी बिग बॉसने केली होती. पण आता एलिस बिग बॉसच्या घराबाहेर गेली आहे.

एलिसच्या जाण्याने अनेक चाहत्यांना आनंद झाला आहे. तर अनेक जणांना तिला टॉप-२ मध्ये पाहायचे होते. बिग बॉसच्या घरातून गेल्या आठवड्यात कोण बाहेर गेले नव्हते. त्यामुळे या आठवड्यात दोन सदस्य घराबाहेर पडतील असे बोले जात आहे. आता बिग बॉसच्या घरात नवीन काय ट्विस्ट येणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT