सलमान खान धर्मेंद्र यांच्याबद्दल बोलताना भावुक झाला.
अलिकडेच धर्मेंद्र यांची तब्येत खालावली आणि ते रुग्णालयात दाखल झाले.
सलमान खानने धर्मेंद्र यांच्याविषयी प्रेम , काळजी व्यक्त केली.
बॉलिवूडचे ही-मॅन धर्मेंद्र (Dharmendra) यांची अलिकडेच तब्येत खालावली आणि ते रुग्णालयात दाखल झाले. मात्र आता त्यांना डिस्चार्ज मिळाला असून त्यांच्यावर घरी उपचार सुरू आहेत. धर्मेंद्र यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. धर्मेंद्र रुग्णालयात दाखल असल्याचे समजताच बॉलिवूडच्या अनेक मोठ्या कलाकारांनी त्यांची भेट घेतली. बॉलिवूडचा भाईजान (Salman Khan) देखील धर्मेंद्र यांना पाहायला हॉस्पिटलमध्ये गेला.
अशात आता सलमान खान 'द-बँग टूर'साठी कतार इथं पोहचला. तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा धर्मेंद्र यांच्या विषयी बोलताना भाईजान भावुक झाला. एका इन्फ्लुएन्सरने सलमान खानला फिटनेसबद्दल विचारले तेव्हा सलमान म्हणाला की, "माझी प्रेरणा धर्मेंद्र जी आहेत. माझ्या आधी फक्त तेच होते. ते माझे वडील आहेत. मी त्यांच्यावर खूप प्रेम करतो. मला आशा आहे की ते आता लवकर बरे होतील..."
धर्मेंद्र यांचे सलमान खानवर खूप प्रेम आहे. 2023 मध्ये धर्मेंद्र यांचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपट खूप गाजला. आता धर्मेंद्र यांचा 'इक्कीस'(Ikkis) चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. नुकताच इक्कीसचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ट्रेलरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. जयदीप अहलावत, एकवली खन्ना, सिकंदर खेर असे अनेक कलाकार पाहायला मिळणार आहे.
सलमान खान सध्या 'बिग बॉस 19' चे होस्टिंग करत आहे. तसेच तो 'बॅटल ऑफ गलवान' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 'बॅटल ऑफ गलवान' चित्रपटात भारतातील एका युद्धाची कहाणी दाखवण्यात येणार आहे. लडाखच्या गलवान व्हॅली घडलेला हा संघर्ष पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 'बॅटल ऑफ गलवान' ही कहाणी जून 2020 रोजी गलवान खोऱ्यात भारतीय आणि चीनी सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षाची आहे. अलिकडेच त्यांचा 'सिकंदर' चित्रपट रिलीज झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.