Salman Khan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Salman Khan : "स्वॅग है भाईजान का"; बॉलिवूडच्या सुलतानचा रॅम्प वॉक, पाहा VIDEO

Salman Khan Ramp Walk : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा रॅम्प वॉक करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहत्यांनी व्हिडीओ पाहून कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Shreya Maskar

सलमान खान सध्या 'बिग बॉस 19'चे होस्टिंग करत आहे.

सलमानने फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक केला आहे.

सलमान खानच्या रॅम्प वॉकचा व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) सध्या 'बिग बॉस 19'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे शनिवार-रविवारी 'वीकेंड का वार'मध्ये सलमान खान पाहायला मिळतो. भाईजान घरातील सदस्यांची शाळा घेतो. तसेच त्यांचे कौतुक देखील करतो. अशात त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये सलमान खान रॅम्प वॉक करताना दिसत आहे. त्याच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

नुकतेच सलमान खानने डिझायनर विक्रम फडणीस यांच्या शोमध्ये भन्नाट रॅम्प वॉक केला. त्याने काळ्या रंगाचा डिझायनर ब्लेझर परिधान केला होता. यावर गोल्डन आणि रेडमध्ये फ्लोरल प्रिंटेड डिझायन पाहायला मिळत आहे. रॅम्प वॉक करताना भाईजानचा वेगळाच स्वॅग पाहायला मिळाला. सलमान खानने आपल्या दिमाखदार शैलीत रॅम्प वॉक केला. रॅम्प वॉक करताना सुलतानचा दबंग स्वॅग पाहून चाहते घायाळ झाले आहेत. या शोमध्ये बॉलिवूडचे अनेक कलाकार पाहायला मिळाले.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

सलमान खानच्या रॅम्प वॉक पाहून चाहते 'सलमान खान मॉर्निंग वॉक करतोय' अशा कमेंट्स देत आहेत. खूप वेळा नंतर सलमान खानला रॅम्प वॉक करताना पाहून चाहत्यांना आनंद झाला. चाहते कौतुक करत "अख्खा बॉलिवूड एक तरफ और भाईजान की वॉक एक तरफ ", "स्वॅग है भाई जान का ", "लव्ह यू सलमान ", "क्या वॉक है यारो " अशा कमेंट्स करत आहेत.

आगामी चित्रपट

सलमान खान 'बिग बॉस 19'सोबतच त्याचा आगामी चित्रपट 'बॅटल ऑफ गलवान' (Battle Of Galwan) च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 'बॅटल ऑफ गलवान' चित्रपटात भारतातील एका युद्धाची कहाणी दाखवण्यात येणार आहे. लडाखच्या गलवान व्हॅली घडलेला हा संघर्ष पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. मात्र अद्याप 'बॅटल ऑफ गलवान' चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: चंद्रपूर हादरले! माहेरी आलेल्या विवाहितेची हत्या, घरात घुसून गळ्यावरून चाकू फिरवला

Maharashtra News Live Update: पेट्रोल, डिझेल दरवाढी विरोधात काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

Shocking : हृदयद्रावक! पत्नीच्या निधनाने पतीला बसला धक्का, तेराव्यालाच उचललं टोकाचं पाऊल

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, फक्त DA आणि फिटमेंट फॅक्टर नाही, तर फॅमिली फॉर्म्यूलाही वाढवू शकतो तुमचा पगार

भर उन्हात मनोज जरांगे इकडे उपोषणाला बसले; तिकडे मराठा बांधवांनी समृद्धी महामार्ग रोखला

SCROLL FOR NEXT