Vicky Kaushal : "घर से नही निकालने वाला हूं..."; विकी कौशलनं कतरिनाच्या डिलिव्हरीबद्दल दिली हिंट

Vicky Kaushal Talk About Pregnancy : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल लवकरच बाबा होणार आहे. त्याने पहिल्यांदाच आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच कतरिनाच्या डिलिव्हरीबद्दल हिंट दिली आहे.
Vicky Kaushal Talk About Pregnancy
Vicky KaushalSAAM TV
Published On
Summary

विकी कौशल आणि कतरिना कैफ लवकरच आई-बाबा होणार आहेत.

कतरिना आणि विकीने सप्टेंबर महिन्यात प्रेग्नेंसीची गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे.

विकी कौशलने पहिल्यांदाच बाबा होण्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

बॉलिवूडची क्युट जोडी विकी कौशल (Vicky Kaushal ) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif Pregnancy ) लवकरच आई-बाबा होणार आहेत. सप्टेंबर महिन्यात त्यांनी ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. कतरिनाने बेबी बंप फ्लॉन्ट करत विकी कौशलसोबतचा फोटो शेअर करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. मीडिया रिपोर्टनुसार, कतरिना कैफ ऑक्टोबर महिन्यात बाळाला जन्म देणार आहे. अशात आता विकी कौशलने देखील कतरिना कैफच्या डिलिव्हरीबद्दल हिंट दिली आहे.

विकी कौशल काय म्हणाला?

मुलाखतीत होणाऱ्या बाळा विषयी बोलताना विकी कौशल म्हणाला, "बाबा होणे...हा सर्वात मोठा आशीर्वाद आहे." नुकतेच 'युवा'शी बोलताना म्हणाला, "मी खरोखर त्याची वाट पाहत आहे. मला वाटते की हा एक मोठा आशीर्वाद आहे. वेळ खूप जवळ आली आहे. मला वाटत नाही की मी घराबाहेर पडेन. (मुझे लग रहा है के मैं घर से नही निकालने वाला हूं )"

तसेच विकी कौशलला इंडस्ट्रीत 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. यावर तो म्हणाला, "ही फक्त सुरुवात आहे. मला अजून खूप काही करायचे आहे. शिकायचे आहे. आनंद पसरवायचा आहे." विकी कौशलने आजवर अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्या अभिनयाचे जगभरात चाहते आहेत.

विकी कौशल - कतरिना कैफ

विकी कौशल आणि कतरिना कैफने 2021 मध्ये लग्नगाठ बांधली आहे. लग्नाच्या 4 वर्षांनी ही दोघे आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहेत.विकी कौशलचा 'छावा' चित्रपट खूप गाजला.

Vicky Kaushal Talk About Pregnancy
Kantara Chapter 1 Collection : बॉक्स ऑफिसवर 'कांतारा 'चा धुराळा; विजयच्या 'GOAT'ला पछाडलं, 500 कोटींच्या उंबरठ्यावर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com