Salman Khan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Salman Khan : अभिनेता सलमान खानवर पाकिस्तान चिडला; थेट दहशतवादी घोषित, नेमकं प्रकरण काय?

Pakistan Talk On Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला पाकिस्तानने दहशतवादी घोषित केले आहे. नेमकं कारण काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

सलमान खान सध्या 'बिग बॉस 19'चे होस्टिंग करत आहे.

सलमान खान लवकरच 'बॅटल ऑफ गलवान' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सलमान खानला पाकिस्तानने दहशतवादी घोषित केले आहे.

बॉलिवूडचा भाईजान सध्या कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चे असतो. अलिकडेच सलमान खानने सौदी अरेबियातील एका कार्यक्रमादरम्यान बलुचिस्तानला पाकिस्तानपासून वेगळे देश म्हणून संबोधले. या विधानामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली. त्यामुळे शाहबाज शरीफ सरकारने सलमान खानला दहशतवादी घोषित केले आहे.

पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाने या संदर्भात अधिकृत अधिसूचना देखील जारी केली आहे. सलमान खानचा समावेश चौथ्या अनुसूचीमध्ये करण्यात आला आहे, जो दहशतवाद विरोधी कायद्यांतर्गत येतो. त्यामुळे त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. मात्र अद्याप सलमान खान किंवा त्याच्या टीमकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

सौदी अरेबियामध्ये आयोजित 'जॉय फोरम 2025' दरम्यान सलमान खानचा एक व्हीडीओ व्हायरल होत होता. व्हिडिओमध्ये सलमान खान म्हणाला, "हे बलुचिस्तानचे लोक आहेत, अफगाणिस्तानचे लोक आहेत, पाकिस्तानचे लोक आहेत, प्रत्येकजण सौदी अरेबियामध्ये कठोर परिश्रम करत आहे." या विधानात त्याने बलुचिस्तानला पाकिस्तानपासून वेगळे देश म्हणून संबोधले. या विधानानंतर पाकिस्तानमध्ये सलमानविरुद्ध संताप दिसून आला आहे. मात्र सलमान खानच्या या वाक्यमुळे बलुचिस्तानमधील लोकांना आनंद झाला आहे.

बलुचिस्तानसाठी स्वतंत्र राज्याची मागणी करणारे नेते मीर यार बलोच म्हणाले की, "चित्रपट अभिनेता सलमान खानने सौदी अरेबियामध्ये बलुचिस्तानचा उल्लेख केल्याने 6 कोटी बलुचिस्तान लोकांना आनंद झाला." सलमान खान सध्या 'बिग बॉस 19'चे होस्टिंग करत आहे. तो प्रत्येक शनिवार-रविवार 'वीकेंड का वार'मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येतो. 'वीकेंड का वार'ला तो घरातील सदस्यांची चांगली शाळा घेतो. तसेच कौतुक देखील करतो. तसेच सलमान खान लवकरच आगामी चित्रपट 'बॅटल ऑफ गलवान' (Battle Of Galwan) मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'बॅटल ऑफ गलवान' चित्रपटात भारतातील एका युद्धाची कहाणी दाखवण्यात येणार आहे. लडाखच्या गलवान व्हॅली घडलेला हा संघर्ष पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 'बॅटल ऑफ गलवान' ही कहाणी जून 2020 रोजी गलवान खोऱ्यात भारतीय आणि चीनी सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षाची आहे.हे युद्ध पारंपरिक शस्त्रांऐवजी दगड, लाकडी काठ्या यांनी लढले गेले. कारण त्या भागात बंदुका वापरण्यावर बंदी होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतरही रवींद्र धंगेकर आपल्या भूमिकेवर ठाम

एवढीशी जरी शंका असती तर... फलटण आत्महत्या प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांचे महत्वपूर्ण विधान|VIDEO

Heavy Rain : निफाडच्या पूर्व भागात परतीच्या पावसाचा हाहाकार; शेतीचे मोठे नुकसान

Mumbai To Phaltan Travel: मुंबईवरून सातारा फलटणपर्यंत प्रवास कसा कराल? वाचा सोपे मार्ग आणि टिप्स

साताऱ्यानंतर अमरावतीत उच्चशिक्षित तरूणीचा आढळला मृतदेह; राहत्या घरात आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT