Sachin Pilgaonkar : निधनापूर्वी सतीश शाह यांचा सचिन पिळगांवकरांना आलेला मेसेज

Sachin Pilgaonkar On Satish Shah death : ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांच्या निधनानंतर मराठी अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते नेमकं काय म्हणाले, जाणून घेऊयात.
Sachin Pilgaonkar On Satish Shah death
Sachin Pilgaonkar SAAM TV
Published On
Summary

ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचे किडनी निकामी झाल्यामुळे निधन झाले.

सतीश शाह यांच्या निधनानंतर सचिन पिळगांवकर यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

निधनापूर्वी सतीश शाह यांचा सचिन पिळगांवकरांना मेसेज आला होता.

आपल्य कॉमेडीने जगाला खळखळवून हसवणारे ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह (Satish Shah) यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. वयाच्या 74 व्या वर्षी सतीश शाह यांनी शेवटचा श्वास घेतला. सतीश शाह यांचे किडनी निकामी झाल्यामुळे निधन झाले. 'साराभाई वर्सेस साराभाई', 'ओम शांती ओम', 'मैं हूं ना' आणि 'जाने भी दो यारों' सारख्या चित्रपट आणि मालिकांमधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. सतीश शाह यांच्या निधनानंतर त्यांचे मित्र सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सतीश शाह यांच्या निधनानंतर 'न्यूज 18'ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सचिन पिळगांवकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, सुप्रिया तीन दिवसांपूर्वी सतीश आणि मधूला भेटून आली होती. सतीशने कोणते तरी गाणे ऐकवले होते. त्यावर मधू आणि सुप्रिया नाचल्या होत्या. सतीश आणि मी नेहमी बोलायचो. मेसेज करायचो. त्याने मला आज (25 ऑक्टोबर2025) दुपारी 12 वाजून 56 मिनिटांनी त्याचा मेसेज आला होता. त्यावेळी तो पूर्णपणे ठीक होता. त्याच्या निधनाची अचानक बातमी ऐकून मला मोठा धक्का बसला.

सचिन पिळगांवकर आणि सतीश शाह यांनी 'गंमत जंमत' या मराठी चित्रपटात एकत्र काम केले. 1987मध्ये 'गंमत जंमत' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. चित्रपटाच्या सेटवर त्यांची चांगली मैत्री झाली. सतीश शाह यांच्या अभिनयाचे लाखो चाहते दिवाने आहेत. त्यांनी दमदार भूमिका साकारल्या आहेत. आजही प्रेक्षकांच्या मनात त्यांच्या भूमिका घर करून आहेत.

Sachin Pilgaonkar On Satish Shah death
Manoj Bajpayee : "फोटो खिंचवाने थोडी आये है..."; मनोज बाजपेयी पापाराझींवर संतापले, पाहा VIDEO

सतीश शाह यांनी 1978 साली रिलीज झालेल्या 'अरविंद देसाई की अजीब दास्तां'मधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. कायम वेगवेगळ्या चित्रपटात ते वेगवेगळ्या भूमिका साकारताना पाहायला मिळाले. सतीश शाह यांची 'साराभाई वर्सेस साराभाई' ही मालिका खूप गाजली.

Sachin Pilgaonkar On Satish Shah death
Satish Shah Last Post : तुम्ही नेहमी...; विनोदी अभिनेते सतीश शाह यांची शेवटची पोस्ट व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com