Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Song Teaser Twitter
मनोरंजन बातम्या

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan मधील नव्या गाण्यावर सलमान- पूजाच्या अफलातून 'हूक स्टेप्स', लयभारी टीझर...

#BilliBilliTeaser: 'बिल्ली बिल्ली'या गाण्याचा ऑफिशल टिजर निर्मात्यांनी शेअर केला असून प्रेक्षकांना सलमान खान आणि पूजा हेगडेची उत्कृष्ट लव्ह केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.

Chetan Bodke

Salman Khan New Song Release: बॉलिवूडचा भाईजान २०२३ मध्ये आपल्या चित्रपटांमुळे कमालीचा चर्चेत आला आहे, यावर्षी सलमानचे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे,'किसी का भाई किसी की जान'. चित्रपटातील दुसरं गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या चित्रपटातील गाण्याचा टीझर सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील पहिले गाणे 'नैयो लगदा' प्रदर्शित झाले होते, या गाण्यालाही चाहत्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता. अलीकडेच, निर्मात्यांनी सिनेमातील दुसरे गाणे 'बिल्ली बिल्ली'चा ऑडिओ सोशल मीडियावर रिलीज केल्याने साहजिकच सिनेप्रेमींची उत्सुकता वाढली आहे. त्यानंतर, आता 'बिल्ली बिल्ली'या गाण्याचा ऑफिशल टिजर निर्मात्यांनी प्रदर्शित केला आहे. ज्यामध्ये प्रेक्षकांना सलमान खान आणि पूजा हेगडेची उत्कृष्ट लव्ह केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.

'सौदा खरा खरा' आणि 'इश्क तेरा तडपावे' यांसारख्या चार्टबस्टर गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेले गायक सुखबीर यांनी 'बिल्ली बिल्ली'हे गाणे गायले आणि कंपोज केले आहे.'बिल्ली बिल्ली' एक जबरदस्त पंजाबी डांस नंबर असून, यामध्ये मेगास्टार आणि सुखबीर पहिल्यांदाच या गाण्यासाठी एकत्र येत आहेत. सलमान खानची हुक स्टेप असलेले 'बिल्ली बिल्ली'हे गाणे 2 मार्च रोजी प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाले आहे.

सलमान खान फिल्म्स प्रॉडक्शनचा 'किसी का भाई किसी की जान'या सिनेमाची निर्मिती ही सलमान खानने केली आहे. तर, फरहाद सामजी यांचे दिग्दर्शन आहे. तसेच, या चित्रपटात सलमान खान, वेंकटेश दग्गुबाती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

अ‍ॅक्शन, कॉमेडी, ड्रामा आणि रोमान्सने निर्मित केलेला 'किसी का भाई किसी की जान'हा चित्रपट 2023च्या ईदला प्रदर्शित होत असून, जगभरात झी स्टुडिओजद्वारे हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं रेकॉर्डब्रेक महागलं! प्रति तोळा इतकी झाली वाढ, वाचा २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

Weekly Horoscope: या राशींच्या व्यक्तींनी आरोग्याची काळजी घ्यावी, जाणून घ्या राशीभविष्य

High Blood Pressure: रोजच्या धावपळीत ताण-थकवा येतोय; दुर्लक्ष करणं पडेल महागात, BPसोबत वाढतील 'या' समस्या

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

पुण्यात गुन्हेगारांना तिकिट देणं आवडलं नाही, फडणवीसांनी अजित पवारांना सुनावले

SCROLL FOR NEXT