Chandramukhi 2: चंद्रमुखी परत येते, कंगनाने शेअर केली चाहत्यांसाठी हटके पोस्ट

कंगनाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर 'चंद्रमुखी २' च्या सेटवरील फोटो शेअर केला आहे.
Kangana Ranaut Latest Social Media Post
Kangana Ranaut Latest Social Media PostTwitter
Published On

Kangana Ranaut Latest Social Media Post: बॉलिवूडमध्ये आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच चर्चेत असते. कंगना आपल्या परखड मतामुळे अनेकदा वादाच्या भोवऱ्यातही सापडली आहे. कंगनाने बऱ्याचदा बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींना ट्वीटरच्या माध्यमातून खडेबोल सुनवत असते. प्रत्येक ट्रेंडिंग मुद्द्यांवर कंगना स्वत:चे मत मांडल्याशिवाय राहत नाही.

बॉलिवूडची पंगा गर्ल कंगना रणौत तिच्या आगामी चित्रपटांमुळे बरीच चर्चेत आली आहे. नुकतेच तिने सोशल मीडियावर तिचा आगामी चित्रपट 'चंद्रमुखी २'च्या शूटिंगला सुरुवात झाल्याची माहिती दिली आहे.

मे 2021 मध्ये कंगनाचं ट्वीटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं होतं, त्यामुळे त्या दरम्यान कंगना बरीच वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. जानेवारी महिन्यात कंगना पुन्हा एकदा ट्वीटरवर परतली आहे. तिची ट्वीटरवर एन्ट्री होताच तिने अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना चांगलंच फैलावर धरलं होतं. नुकतंच कंगनाने तिच्या नव्या चित्रपटाबद्दल चाहत्यांसोबत माहिती शेअर केली आहे.

Kangana Ranaut Latest Social Media Post
Hemant Dhome: एका गाण्यासाठी घेतला दिग्दर्शकाने हटके निर्णय, हेमंत ढोमेने सांगितला ‘सातारचा सलमान’ चित्रपटाचा किस्सा

कंगनाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर 'चंद्रमुखी २' च्या सेटवरील फोटो शेअर केला आहे. ती चित्रपटाच्या सेटवर येताच शूटिंगला सुरुवात केली आहे. या फोटोमध्ये कंगना मेकअप रूममध्ये दिसत असून चित्रपटातील लूकची तयारी करत आहे. फोटोमध्ये तिची मेकअप टीमही दिसत असून तिला चंद्रमुखीचा लूक देताना दिसत आहे.

कंगनाने गेल्या वर्षीच या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटात कंगनासोबत राघव लॉरेन्स देखील आहे. हा चित्रपट 2005 मध्ये रजनीकांत अभिनीत चंद्रमुखी या हॉरर-कॉमेडी चित्रपटाचा सिक्वेल आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंगना या चित्रपटात डान्सरच्या भूमिकेत दिसणार आहे.

Kangana Ranaut Latest Social Media Post
Allu Arjun: अल्लू अर्जुन ने पुष्पासाठी थेट चेहरा मोहराच बदलला, केलंय मोठं ऑपरेशन

चंद्रमुखी व्यतिरिक्त, कंगना तिच्या बहुप्रतिक्षित 'इमर्जन्सी' चित्रपटासाठी देखील चर्चेत आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित हा पॉलिटिक-ड्रामा चित्रपट आहे. चित्रपटात कंगना इंदिरा गांधींची भूमिका साकारत आहे.

कंगनाने 'इमर्जन्सी' चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती दोन्ही ही केले आहे. यासोबतच कंगनाकडे 'मणिकर्णिका रिटर्न्स', 'द इनकार्नेशन: सीता' आणि 'तेजस' सारखे चित्रपट आहेत. ‘टिकू वेड्स शेरू’ या चित्रपटाची निर्मितीसुद्धा निर्मिती कंगनाने केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com