Salman Khan Firing Case Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan House Firing Case : सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणाचे हरियाणा कनेक्शन, गुन्हे शाखेकडून सहाव्या आरोपीला अटक

Salman Khan House Firing Case Update : मुंबई पोलिसांनी सलमान खान गोळीबार प्रकरणी हरियाणामधून सहाव्या आरोपीला अटक केली आहे.

Chetan Bodke

बॉलिवूडचा भाईजान म्हणून सर्वश्रृत असलेल्या सलमान खानच्या घरावर गेल्या महिन्यात गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणामध्ये आतापर्यंत पाच जणांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. अशातच आता मुंबई पोलिसांनी सहाव्या आरोपीला अटक केली आहे.

विक्की चौधरी, सागर पाल, सोनू चंदर अनुज थापन आणि मोहम्मद चौधरी असं पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींचे नाव आहेत. आज सकाळी मुंबई गुन्हे शाखेने सहाव्या आरोपीला अटक केली आहे.. अद्याप त्या आरोपीचं नाव कळू शकलेलं नाही. याला आज हरियाणाच्या फतेहाबादवरून गुन्हे शाखेने केली अटक आहे. आज मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून त्या आरोपीला मोक्का कोर्टात हजर केले जाणार आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या एकूण सहा इतकी झालेली आहे.

सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणातील पाचवा आरोपी मोहम्मद रफिक चौधरी हा गँगस्टर रोहित गोदराच्या संपर्कात होता. या दोघांचीही भेट एका ॲपद्वारे झालेली होती. चौधरीने गोळीबार करणाऱ्यांना मदत पुरवली होती. रोहित गोदाराने अनमोल बिश्नोईशी कॉन्फरन्स कॉलवर करुन या गोळीबाराची चर्चा केली होती, अशी माहिती गुन्हे शाखेकडून देण्यात आलीय.

रोहित गोदाराच्या सांगण्यावरुन त्याने शूटर विक्की गुप्ता आणि सागर पालची मुंबईत आल्यावर त्यांची राहण्याची व्यवस्था केली होती. सलमानच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर दोन दिवसात गुन्हे शाखेने पहिली अटक करताच अटकेच्या भीतीने मोहम्मद चौधरी राजस्थानला पळाल्याचं गुन्हे शाखेकडून सांगण्यात येत आहे. मोहम्मद रफिक चौधरीवर शूटरना आर्थिक सहाय्य करणे तसेच रेकी करणे आणि कट रचण्याचा आरोप ठेवण्यात आल्याची माहिती गु्न्हे शाखेने दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वाशिम जिल्ह्यातील 6 पंचायत समित्यांच्या सभापदी पदाचे आरक्षण जाहीर

Accident News : फुटबॉलपटूचा भीषण अपघात; दुखापतीमुळे शस्त्रक्रिया, १० महिने चालता येणार नाही

Pawan Singh: पिल्स खायला दिल्या, अबॉर्शन करायला भाग पाडलं अन्...; प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचे धक्कादायक आरोप

अपघातात मृत्यू, अंत्यसंस्कारावेळी केक कापला; स्मशानभूमीतच वडिलांकडून लेकीचं वाढदिवस साजरा

Political News : भाजपचं टेन्शन वाढलं, बिहारमध्ये जागावाटपावरून केंद्रीय मंत्री नाराज, थेट ऑफर धुडकावली

SCROLL FOR NEXT