Battle Of Galwan Teaser Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan: मौत दिखे तो सलाम…; सलमान खान पुन्हा सैनिकाच्या भूमिकेत, 'बॅटल ऑफ गलवान'चा दमदार टिझर प्रदर्शित

Battle Of Galwan Teaser: सलमान खानच्या आज ६० व्या वाढदिवशी, त्याच्या आगामी चित्रपट "बॅटल ऑफ गलवान" चा टीझर रिलीज झाला आहे. टीझरमध्ये, अभिनेता एका लष्करी अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे.

Shruti Vilas Kadam

Battle of Galwan: बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने चाहत्यांना खास भेट देत बहुप्रतिक्षित ‘बॅटल ऑफ गलवान’ या चित्रपटाचा दमदार टीझर रिलीज केला आहे. मात्र हा टीझर केवळ सेलिब्रेशनपुरता मर्यादित नसून, देशाच्या सीमेवर उभे राहून प्राणपणाने लढणाऱ्या भारतीय सैनिकांना अर्पण केलेले अभिवादन आहे. या चित्रपटाचा टीझर, डॉयलॉग आणि लूकने पाहताच प्रेक्षकांच्या अंगावर अक्षरशः शहारे आले आहेत.

या चित्रपटात सलमान खान भारतीय सैन्याच्या अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असून, त्याचा हा अवतार आजवरच्या त्याच्या सर्वात प्रभावी आणि दमदार भूमिकांपैकी एक मानला जात आहे. कणखर देहयष्टी, संयमी स्वभाव, नियंत्रित आक्रमकता आणि शांततेतून व्यक्त होणारी ताकद या सगळ्यांचा प्रभावी संगम या पात्रात पाहायला मिळतो. विशेषतः टीझरच्या शेवटच्या क्षणी सलमान खानची निर्धारपूर्ण नजर प्रेक्षकांच्या मनावर खोल ठसा उमटवते.

टीझरमध्ये हिमालयातील कठोर आणि निर्दयी भूभाग, बर्फाच्छादित पर्वत, उंचावरची सीमारेषा आणि तिथे लढल्या जाणाऱ्या युद्धाची वास्तववादी झलक प्रभावीपणे दाखवण्यात आली आहे. गलवान खोऱ्यातील संघर्षाची तीव्रता आणि सैनिकांच्या मानसिक-शारीरिक कसोटीचे चित्रण टीझरमधून स्पष्टपणे जाणवते.

या टीझरला गायक स्टेबिन बेन यांच्या भावस्पर्शी आवाजाची साथ लाभली असून, त्यामुळे दृश्यांमधील भावनिक खोली अधिकच वाढते. त्याचबरोबर संगीतकार हिमेश रेशमिया यांनी दिलेले दमदार पार्श्वसंगीत प्रत्येक फ्रेमला अधिक ताकद आणि प्रभाव देताना दिसते.

अपुर्व लखिया दिग्दर्शित हा चित्रपट शौर्य, त्याग आणि जिद्दीचे थरारक व निःसंग चित्रण करतो. चित्रपटात चित्रांगदा सिंगही महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार असून, ‘बॅटल ऑफ गलवान’ची निर्मिती सलमान खान फिल्म्स या बॅनरखाली होत आहे. देशभक्ती, वास्तववाद आणि भावनांचा संगम असलेला हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur : बदलापूरमध्ये इर्शाळवाडी दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार? वाचा, नेमकं प्रकरण काय?

Bridal Green Bangles Design: नववधूसाठी हिरव्या चुड्याच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स, प्रत्येक साडीवर उठून दिसतील

Bread Dishes : ब्रेड पासून बनणाऱ्या झटपट 5 टेस्टी डिशेस

Kalyan Dombivli : ठाकरेसेनेच्या नॉट रिचेबल नगरसेवकांचा शिंदेंसेनेला पाठिंबा? श्रीकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, नेमकं काय म्हणाले

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसच्या घरात शिवीगाळ; प्राजक्ता-अनुश्रीमध्ये टोकाचे भांडण, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT