Sikandar  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan crazy Fan: 'सिकंदर'साठी फॅन्स क्रेझी; चाहत्याने मोफत वाटली १.७२ लाख रुपयांची तिकिटे, VIDEO व्हायरल

Salman Khan Sikandar Ticket: सलमान खान-रश्मिका मंदान्ना यांचा 'सिकंदर' हा चित्रपट ईद आणि गुढी पाडव्याला प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन ए.आर. मुरुगादोस यांनी केले आहे.

Shruti Vilas Kadam

Salman Khan crazy Fan: सलमान खान-रश्मिका मंदान्ना यांचा बहुप्रतिक्षित अॅक्शन चित्रपट 'सिकंदर' आज बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला आहे. ईद आणि गुढी पाडव्याच्या निमित्ताने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची क्रेझ चाहत्यांमध्ये शिगेला पोहोचली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये सलमानच्या चाहत्याने १.७२ लाख रुपयांची तिकिटे फ्रीमध्ये वाटताना दिसत आहे. सलमान खानच्या या वेड्या चाहत्याचे नाव कुलदीप कासवान आहे, जो राजस्थानचा रहिवासी आहे.

कुलदीप कासवान म्हणाले की, त्याच्या आवडत्या स्टारला पाठिंबा देण्यासाठी त्याने ही तिकिटे विकत घेतली आहेत. त्याने १.७२ लाख रुपयांची तिकिटे खरेदी केली आणि ती मोफत वाटली जेणेकरून अधिकाधिक लोकांना मोठ्या पडद्यावर भाईजानचा चित्रपट पाहता येईल. त्याने असा दावा केला की त्याने हे यापूर्वी अनेक शहरांमध्ये केले आहे. तो म्हणाला, "मी सलमान खानसाठी काहीतरी नेहमीच करत राहतो. त्याच्या वाढदिवशी मी गरजूंना अन्न वाटले आणि आता मी तिकिटे वाटत आहे. मी सुमारे १ लाख ७२ हजार खर्च करून ८०० तिकिटे खरेदी केली आहेत."

सलमान खानच्या वाढदिवशी वाटण्यात आले ६.३५ लाख रुपयांचे बीइंग ह्युमन कपडे

काही महिन्यांपूर्वी सलमान खानच्या ५९ व्या वाढदिवशी कुलदीप कासवान याने बीइंग ह्युमन ब्रँडचे कपडे वाटले होते. इन्स्टंट बॉलीवूडशी झालेल्या संभाषणात त्यांनी भाईजानच्या वाढदिवसाला ६.३५ लाख रुपये खर्च करून गरजूंना कपडे वाटल्याचे उघड केले.

'सिकंदर'मध्ये सलमान खानचा हाय-ऑक्टेन अ‍ॅक्शन अवतार

ए.आर. मुरुगादोस दिग्दर्शित 'सिकंदर' या चित्रपटात सलमान खानचा हाय-ऑक्टेन अ‍ॅक्शन अवतार पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. यात रश्मिका मंदान्ना, प्रतीक पाटील, काजल अग्रवाल आणि सत्यराज यांच्याही भूमिका आहेत. साजिद नाडियाडवाला यांनी 'सिकंदर'ची निर्मिती केली आहे. याआधी साजिद आणि सलमान खान यांनी 'किक' या ब्लॉकबस्टर चित्रपटात एकत्र काम केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT