Salman Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan: प्रसिद्ध अभिनेत्याच्या निधनाने सलमान खानला दु:ख अनावर; 'मातृभूमी' चित्रपटाचं रिलीज थांबवलं

Salman Khan: सलमान खानच्या 'मातृभूमी' या चित्रपटासाठी प्रेक्षकांना कदाचित आणखी वाट पाहावी लागणार आहे. या चित्रपटातील एका अभिनेत्याच्या निधनामुळे, चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

Shruti Vilas Kadam

Tumbbadchi Manjula: हे डोळे कुणाचे..? गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'तुंबाडची मंजुळा'Salman Khan: सलमान खानच्या 'मातृभूमी' या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबतची उत्सुकता वाढत आहे. सुरुवातीला, हा चित्रपट एप्रिल २०२६ मध्ये प्रदर्शित होणार होता. अमात्र, त्यानंतर चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलल्याची बातमी समोर आली. माहिती नुसार, सलमानच्या या चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी आणखी काळ थांबाव लागणार आहे. याचे कारण म्हणजे, या चित्रपटावर काम करत असलेले अभिनेते-गायक प्रशांत तामांग यांचे निधन. या सलमान खान अभिनीत चित्रपटात प्रशांत तामांग एक अत्यंत महत्त्वाची भूमिका साकारत होते; मात्र, हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यामुळे, तामांग यांच्या निधनामुळे 'मातृभूमी'चे प्रदर्शन लांबणीवर पडले शकते.

प्रशांत तामांग यांच्या निधन

'इंडियन आयडल ३'चा विजेता असलेल्या प्रशांत तामांग याने 'पाताल लोक २' या वेब सीरिजमध्येही काम केले होते. तो नेपाळी चित्रपटसृष्टी आणि म्युझिक व्हिडिओसाठी एक प्रसिद्ध चेहरा होता. मात्र, या वर्षाच्या सुरुवातीलाच दिल्ली येथे त्याचे निधन झाले. वृत्तांनुसार, प्रशांत हा सलमान खानच्या या चित्रपटाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग होता आणि त्याला अनेक मोठे सीन करायचे होते. मात्र, त्याच्या निधनामुळे हे सीन आता अपूर्णच राहिली आहेत. 'इंडिया टीव्ही'च्या एका वृत्तानुसार, प्रशांतच्या पात्रासाठी दुसऱ्या अभिनेत्याची निवड करणे आणि ती दृश्ये पुन्हा चित्रित करणे, हे 'मातृभूमी'च्या निर्मितीसाठी कठीण आहे. तसेच, प्रशांतसोबत मूळतः चित्रित केलेली ॲक्शन सीन पुन्हा चित्रित केल्यास चित्रपटाचे बजेट मोठ्या प्रमाणात वाढू शकते, असेही नमूद करण्यात आले आहे.

१५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रदर्शित

सलमान खानच्या या चित्रपटाची शूटिंग सध्या सुरू आहे. येत्या काही महिन्यांत निर्मितीचे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, आणि त्यानंतर चित्रपटाच्या 'पोस्ट-प्रॉडक्शन'चे काम सुरू होईल. मातृभूमी हा चित्रपट २०२६ च्या १५ ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन) च्या मुहूर्तावर प्रदर्शित होऊ शकतो, अशी जोरदार चर्चा सुरू आहे.

विशेष म्हणजे, सलमान खानच्या या चित्रपटाचे मूळ नाव बॅटल ऑफ गलवान (Battle of Galwan) असे होते. मात्र, निर्मात्यांनी अलीकडेच चित्रपटाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आणि मातृभूमी असे केले. या चित्रपटात २०२० मधील भारत आणि चीन यांच्यातील 'गलवान संघर्ष' चित्रित करण्यात येणार आहे. सलमान व्यतिरिक्त, चित्रांगदा सिंग या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच, गोविंदा देखील या चित्रपटात एका छोट्या भूमिकेत झळकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

America- Iran: मोठी बातमी! अमेरिका-इराण शांतता चर्चा अयशस्वी, इराणला अटी मान्य नाही, आता डोनाल्ड ट्र्म्प काय निर्णय घेणार?

Weight Loss Recipe : झटपट वजन कमी करायचंय? रोज सकाळी करा 'हा' हेल्दी नाश्ता, पोट दीर्घकाळ भरलेले राहील

Maharashtra News Live Update: बारामती पोटनिवडणुकीसाठी आजपासून प्रचाराला सुरूवात

IPL CSK vs DC: अखेर चेन्नई सुपर किंग्सनं उघडलं विजयाचं खातं; सॅमसन-ओव्हरटन ठरले हिरो

Asha Bhosle Health Update: आशा भोसले यांच्या नातनं दिली आजीच्या प्रकृतीची अपडेट; काय म्हणाली जनाई?

SCROLL FOR NEXT