बॉलिवूड अभिनेता सलमान खान धमकी प्रकरणात अनेक अपडेट समोर येत आहेत. मागील अनेक दिवसांपासून सलमान खानला जिवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. अलिकडेच मुंबई वाहतूक पोलिसांच्या नंबरवर सलमान खानला संपवण्याच्या मेसेज आला होता. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. नुकतंच याबाबत नवीन अपडेट समोर आली आहे.
सलमान खानला धमकीचा मेसेज पाठवून पाच कोटी रूपयांची मागणी करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांना झारखंडमधील एका नंबरवरून हा मेसेज आल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर मुंबईतून वरळी पोलिसांचे पथक चौकशीसाठी रवाना करण्यात आले. पोलिसांनी या स्थळी जाऊन तपास सुरू केला असता व्हॉट्सअप हेल्पलाईनवर सलमान खानकडे पाच कोटी रूपये खंडणी मागणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले आहे.
झारखंडमधून पोलिसांनी शेख हुसेन वय २४ वर्षे या व्यक्तीला ताबडतोब अटक केली आहे. त्याच्याजवळील मोबाईलचा जप्त केला असून याच व्यक्तीने मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअपवर मेसेज पाठवला होता हे समोर आले आहे. या व्यक्तीची पोलिसांनी चौकशी केली असता हा व्यक्ती भाजी विकणारा आहे अशी माहिती समोर आली आहे. पोलिस आपला शोध घेत आहे. यामुळे या व्यक्तीने पोलिसांना मेसेज चुकून पाठवला असे म्हणत पोलिसांची माफी मागितली आहे.
काय होता मॅसेज
सलमान खान मागील आठवड्यात धमकीचा मेसेज आला होता. या धमकी मेसेजमध्ये, ही धमकी हलक्यात घेऊ नका, सलमान खानला जिवंत रहायचे असेल आणि लॉरेन्स बिश्नोईबरोबर भांडण मिटवायचं आहे, तर 5 कोटी रुपये पाठवा. पैसे न पाठवल्यास सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षाही वाईट होईल.'असे म्हटले होते. यानुसार पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली होती. सलमान धमकी देणारा व्यक्तीला पोलिसांनी अटक केले आहे. अटक करण्यात आलेला व्यक्ती शेख हुसेन हा भाजीपाला विकतो, असे सांगण्यात येत आहे. त्याने टीव्हीवर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि सलमान खानशी संबंधित बातम्या पाहिल्या होत्या. त्याआधारे त्याने हे पाऊल उचलले असल्याचे म्हटले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.