Sohail Khan Breaks Traffic Rules Saam tv
मनोरंजन बातम्या

Sohail Khan: सलमानच्या भावाने हेल्मेट न घालता चालवली बाईक; VIDEO शुट करताच घातली शिवी, आता मागितली माफी

Sohail Khan Breaks Traffic Rules: सोहेल खान हेल्मेट न घालता चालवत होता बाईक. व्हिडिओ करणाऱ्याला केली शिवीगाळ. व्हिडिओ व्हायरल होताच नेटकरी संतापले.

Shruti Vilas Kadam

Sohail Khan Breaks Traffic Rules: बॉलिवूड अभिनेता आणि सलमान खानचा भाऊ सोहेल खानचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यात तो मुंबईच्या रस्त्यावर हेल्मेट न घालता बाईक चालवताना दिसला. या व्हिडिओतून दिसते की सोहेल हेल्मेटशिवाय आपल्या बाईकवर आहेत आणि व्हिडिओ करणाऱ्या व्यक्तीला शिवीगाळ करत आहे. त्याच्या या वागणूकीमुळे नेटकरी त्याला मोठ्या प्रमाणात ट्राेल करत आहेत.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, अनेकांनी त्याच्या असुरक्षित वर्तनावर प्रश्न उपस्थित केले आणि सोशल फेमस पर्सन म्हणून त्याच्या वागण्याला बेजबाबदार अशी टीका केली. या प्रकरणामुळे चाहत्यांमध्ये आणि सोशल मिडियावर त्याला ट्रोल करण्यात येत आहे.

या नंतर सोहेल खानने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक माफीनामा प्रकाशित केला. त्यात त्यांनी स्पष्ट केले की, कधीकधी तो हेल्मेट न घालण्याचे कारण म्हणजे त्याला क्लॉस्ट्रोफोबिया (बंद जागेत अडकल्यासारखे वाटणे) हा त्रास आहे. यामुळे हेल्मेटमध्ये असताना त्याला त्रास होतो. परंतु, त्यांनी ही गोष्ट कधीही नियम मोडण्याचे कारण नाही असेही मान्य केले आणि त्याची चूक कबूल केली.

सोहेलने आपल्या पोस्टमध्ये सर्व बाइक राइडर्सला हेल्मेट घालण्याचे आणि सगळ्यांना सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. त्याने म्हटले की, हेल्मेट घालणे आपल्या सुरक्षेसाठी आवश्यक आहे आणि सुरक्षित राहणे, उशीर होण्यारपेक्षा चांगले आहे”. तो पुढे म्हणाला की, आपल्या क्लॉस्ट्रोफोबियावर काम करून पुढे हेल्मेट नियमितपणे घालण्याचा प्रयत्न करेल. त्याशिवाय त्यांनी ट्रॅफिक अधिकाऱ्यांनाही माफी मागितली आणि भविष्यात ते सर्व ट्रॅफिक नियमांचे काटेकोर पालन करणार असल्याचे आश्वासन दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Travel : जगातील ५ सर्वात स्वस्त टूरिस्ट प्लेसेस, आयुष्यात एकदा तरी या ठिकणाला भेट द्या

Maharashtra Live News Update : जळगावात शरद पवार गटाला धक्का! जिल्हाध्यक्षाचा तडकाफडकी राजीनामा

Adhik Maas 2026: हिंदू नववर्ष 2083 मध्ये 12 नव्हे तर असणार 13 महिने; जाणून घ्या यागामचं धार्मिक कारण

Makar Sankranti 2026: तब्बल १९ वर्षांनंतर होणार चमत्कार; 'या' ३ राशींचं नशीब संक्रांतीला उजळणार

अंबरनाथमध्ये शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी खेळी; अजित पवारांच्या नेत्याची उपनगराध्यक्षपदी निवड

SCROLL FOR NEXT