Salman Khan Birthday SAAM TV
मनोरंजन बातम्या

Salman Khan Birthday : सलमान खान अजूनही सिंगल का आहे? लग्न न करण्याची 'ही' आहेत 5 मोठी कारणे

Salman Khan Birthday Bash: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आज ५९ वर्षांचा झाला आहे. या वयातही अभिनेता अजूनही बॅचलर आहे. सलमान खानने लग्न का केले नाही यामागे पुढील ५ मोठी कारणे असू शकतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Salman Khan Birthday: बॉलिवूडचा 'दबंग' सलमान खानचा आज ५९ वा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने त्याचे चाहते त्याला सोशल मीडियावरून शुभेच्छा देत आहेत. विशेष म्हणजे दरवर्षी सलमानचा वाढदिवस जवळ येताच त्याच्या लग्नावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. वयाच्या 59 व्या वर्षीही, सलमान अजूनही बॅचलर आहे. त्याच्या आयुष्यात एकही मुलगी आली नाही असे नाही. सलमानच्या अनेक गर्लफ्रेंड झाल्या पण त्याने कोणाशी लग्न केलेले नाही. यामागे पुढील ५ कारणे असू शकतात, जी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

ऐश्वर्यासोबतचे नाते

एकेकाळी ऐश्वर्या आणि सलमान खान दोघेही एकमेकांच्या प्रेमात वेडे होते. मात्र, ब्रेकअपनंतर सुपरस्टार सलमान खान एकटा पडला. असे नाही की त्याच्या आयुष्यात त्यानंतर कोणी नाही पण कदाचित सलमान ऐश्वर्या रायला कधीच विसरू शकला नाही असे बी टाऊनमध्ये म्हटले जाते. त्यामुळे त्यांनी बॅचलर राहण्याचा निर्णय घेतला असावा.

अभिनेत्याची एंगेजमेंट तुटली

एकेकाळी संगीता बिजलानीने सलमान खानच्या आयुष्यात प्रवेश केला होता. त्यांच्या लग्नाच्या पत्रिकाही वाटल्या गेल्या. पण कालांतराने त्यांची लगनगाठी तुटल्याचे बोलले जात आहे. यानंतर सलमानच्या लग्नाला पूर्णविराम मिळाला.

सलमान हिंमत दाखवू शकला नाही

सोमी खान, लुलिया वंतूर आणि कतरिना कैफ सलमान खानच्या आयुष्यात आल्या ज्या त्याच्या खूप जवळच्या होत्या. कदाचित अभिनेता लग्न करेल अशी अटकळ देखील पसरल्या होत्या. पण चाहत्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. पण, सलमानने लग्नासाठी हिंमत कधी दाखवली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमानचे वडील सलीम खान यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, अभिनेते रिलेशनशिपमध्ये येतो करतात पण तो लग्न करण्याचे धाडस करू शकत नाहीत

राग हे देखील एक कारण आहे

सलमान खान एकदा एका रिॲलिटी शोमध्ये म्हणाला होता. एकेकाळी त्याला खूप राग यायचा. त्यामुळे त्याची अनेकांची नाती बिघडली. जर त्याने लग्न केले तर रागामुळे त्याचे नाते बिघडू शकते असे अभिनेत्याला वाटते.

अभिनेता त्याच्या पालकांच्या खूप जवळ आहे

सलमान खानने अनेकदा सांगितले आहे की तो त्याच्या पालकांच्या खूप जवळ आहे. त्यांच्यापासून दूर राहण्याचा विचारही करत नाहीत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अरबाज खानने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याच्या वडिलांनी सांगितले की, लग्नानंतर मुलांना त्यांचे घर सोडून दुसऱ्या घरात शिफ्ट व्हावे लागेल. सलमानने लग्न न करण्यामागे हे देखील कारण असू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Monday : सोमवार ठरणार भाग्याचा, रखडलेली कामे होणार पूर्ण; वाचा राशीभविष्य

Vastu Tips For Luck: चांगले दिवस येण्यापूर्वी दिसतात 'हे' शुभ संकेत

Garlic Benefits : लसूण खाण्याची योग्य पद्धत आणि जबरदस्त फायदे

Anna Hazare:'अण्णा आता तरी उठा'! ... मग तुम्ही झोपून राहणार का? बॅनरबाजीवर अण्णा हजारे भडकले

Vice president Election : उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचा उमेदवार ठरला; भाजप अध्यक्षांकडून नाव जाहीर

SCROLL FOR NEXT