Hina Khan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Hina Khan : सलमानच्या 'बिग बॉस 19'ची मोठी अपडेट, हिना खान शोमध्ये दिसणार?

Bigg Boss 19 Update : सलमान खानचे 'बिग बॉस 19' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शोमध्ये हिना खानची एन्ट्री होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस 19' सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'बिग बॉस 19' मध्ये बॉलिवूडचा भाईजान सलमान खान होस्टिंग करणार आहे.

शोमध्ये अभिनेत्री हिना खान भाग घेणार असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.

सध्या सलमान खानचा (Salman Khan) 'बिग बॉस 19' (Bigg Boss 19 ) चांगलाच चर्चेत आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी शो सुरू होणार आहे. शोमध्ये कोणते चेहरे पाहायला मिळणार याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. आता 'बिग बॉस 19' विषयी मोठी अपडेट समोर आली आहे. टीव्ही अभिनेत्री हिना खान (Hina Khan) 'बिग बॉस 19' मध्ये येणार असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.

अलिकडेच काही दिवसांपूर्वी सलमान खानने 'बिग बॉस 19' एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात शो सुरू होण्याची तारीख सांगितली आहे. व्हिडीओत सलमान खान एका वेगळ्या अंदाजात पाहायला मिळत आहे. व्हिडीओत सलमान खान नेत्याच्या भूमिकेत दिसत आहे. त्यामुळे 'बिग बॉस 19'ची थीम राजकारणाशी संबंधित असणार अशी चर्चा सुरू झाली आहे. या व्हिडीओला हटके कॅप्शन देण्यात आले आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं की, "लौट आया हूँ मैं लेके बिग बॉस का नया सीझन! और इस बार चलेगी - घरवालों की सरकार"

'बिग बॉस 19' पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे. सोशल मीडियावर अनेक नावांची चर्चा पाहायला मिळत आहे. त्यात आता अजून एका नावाची भर पडली आहे. 'बिग बॉस 19' हिना खान येणार असल्याचे बोले जात आहे. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही आहे. हिना खान याआधी 'बिग बॉस 11' मध्ये पाहायला मिळाली होती. तिला चाहत्यांनी खूप प्रेम दिले. तिचा बिग बॉसमधील गेम चाहत्यांना खूप आवडला.

'बिग बॉस 11'ची ट्रॉफी शिल्पा शिंदेने उचलली होती. तर हिना खान पर्वाची उपविजेती ठरली. त्यामुळे आता हिना खान 'बिग बॉस 19'मध्ये कधी, कुठे, कशी पाहायला मिळणार हा प्रश्न देखील नेटकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे प्रेक्षक शो पाहण्यासाठी उत्सुक आहेत. भाईजानचा 'बिग बॉस 19' शो 24 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'बिग बॉस 19' कधी सुरू होणार?

24 ऑगस्ट

'बिग बॉस 19' चं होस्टिंग कोण करणार?

सलमान खान

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Gang war: भर चौकात गणेशचा केला गेम; हाती कोयता घेऊ मारेकऱ्यांची धूम, हत्याकांडाचा CCTV आला समोर

Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य,धक्कादायक कारण आलं समोर

Akola Crime: 'माझं तुझ्यावर खूप प्रेम; अग्निवीर जवानाकडून लग्नाच्या भूलथापा, 29 वर्षीय किन्नरवर अत्याचार

दोन पिस्तूल, कोयता आणि भयानक कट… असा रचला अक्षय नागलकरच्या हत्येचा प्लॅन|VIDEO

Raigad News: पोहण्याचा मोह जिवाशी आला! अलिबागमधील समुद्रात दोन तरुण बुडाले, ड्रोनद्वारे शोध सुरू

SCROLL FOR NEXT