Bigg Boss  yandex
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Show: बिग बॉस हिंदी आणि तमिळचा डंका एकाच दिवशी; प्रेक्षकांना मिळणार डबल धमाका

Bigg Boss 18 and Tamil Bigg Boss 8 : सलमान खान बिग बॉस 18 आणि तमिळ स्टार विजय सेतुपतीचा बिग बॉस 8 एकाच दिवशी

Sneha Dhavale

बिग बॉस हा रियालिटी शो जेव्हापासून भारतात सुरु झाला तेव्हापासून आजपर्यंत या शोनं बराच प्रेक्षकवर्ग कमावला आहे. या रियालिटी शोचा प्रत्येक सिझन गाजला. त्यामुळे या शोचे बऱ्याच भारतीय भाषांमध्ये व्हर्जन्स निघाले.

त्यातही हिंदी बिग बॉस आणि सलमान खान हे आता एक समीकरणच झालंय. सलमान खानने 2010 पासून 'बिग बॉस' होस्ट करायला सुरुवात केली. आता सलमान बिग बॉस 18 घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 6 ऑक्टोबरला सलमान बिग बॉस 18 द्वारे प्रेक्षकांसमोर येतोय.

बिग बॉसच्या फॅन्ससाठी आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे, हिंदीचा 18 वा सिझन जसा येतो आहे त्याप्रमाणेच तमिळ बिग बॉसचा 8 वा सिझनही येतो आहे. तेही 6 ऑक्टोबरलाच. काय आहे कि नाही डबल धमाका. तमिळ स्टार विजय सेतुपती तमिळ बिग बॉसचा 8 वा सिझन होस्ट करणार आहे.

बिग बॉस हिंदीच्या 18 व्या सिझनचा प्रिमियर कलर्स आणि जिओ सिनेमावर होणार आहे. हिंदी बिग बॉस तर प्रसिद्ध आहेच पण बिग बॉसचं तमिळ व्हर्जनही खुप गाजत आहे. त्याचबरोबर तमिळ बिग बॉसचा 8 वा सिझन 6 ऑक्टोबरलाच 'स्टार विजय टिव्ही' या वाहिनीवर लाँच होणार आहे. विजय टेलिव्हिजनच्या ऑफिशियल इंस्टा हँडलवर तमिळ बिग बॉस 8 चा टिझरही पोस्ट करण्यात आला आहे.

तमिळ स्टार विजय सेतुपती हा साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधला एक असा अभिनेता आहे ज्याचं फॅन फॉलॉइंग प्रचंड आहे. आता विजय तमिळ बिग बॉसचा 8 वा सिझन होस्ट करणार असल्यानं त्याचे फॅन्सही उत्साहात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ram Charan Bodyguard : सलमानच्या शेरानंतर राम चरणच्या बॉडीगार्डची चर्चा; उत्साही चाहत्याला एका झटक्यात बाजूला केलं, 'केविन कुंटा' आहे तरी कोण?

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये भीषण अपघात, २ जणांचा मृत्यू

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! २ लाखांपर्यंतचे कर्जमाफ; पण कुणाला मिळणार लाभ? राज्य सरकारच्या योजनेत नेमकं काय?

Weather Update : मोठी बातमी! अखेर 'तो' क्षण आला; पुढील काही तासांत मान्सून धडकणार, 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Mumbai Rain : वरुणराजाचं थाटात आगमन! मुंबई-उपनगरात काळे ढग दाटले, मुसळधार पाऊस सुरू

SCROLL FOR NEXT