Salman Khan saam tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan : 'मातृभूमी' चित्रपटानंतर भाईजानचा आणखी एक धमाका; नव्या सिनेमाची घोषणा, पहिला फोटो आला समोर

Salman Khan New Movie Announcement : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. एक खास फोटो शेअर करून त्याने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली.

Shreya Maskar

सलमान खानने नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे.

दिग्दर्शकासोबत एका खास फोटो सलमानने शेअर केला आहे.

चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे.

बॉलिवूडचा भाईजान सध्या त्याचा आगामी चित्रपट 'मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस'मुळे चांगलाच चर्चेत आहे. चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. अशात सलमान खानने आता एक आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्याने आपल्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. सलमान खान ॲक्शन-थ्रिलर चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तेलुगू दिग्दर्शन वामशी पेडिपल्लीसोबत सलमान काम करणार आहे.

सलमान खानने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्याने सर्वांचे लक्ष वेधू घेतले आहे. सलमानने दिग्दर्शकासोबतचा एक फोटो शेअर करत नवीन चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटाचे नाव अद्याप सांगितले नाही. मात्र मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खानचा नवीन चित्रपट ईद २०२७ च्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्याचे नियोजन असल्याचे समजते. या चित्रपटाचे चित्रीकरण एप्रिल २०२६ मध्ये सुरू होणार आहे.

सलमान खानने शेअर केलेल्या पोस्टला एक हटके कॅप्शन दिले आहे. त्याने लिहिलं की, "दिल, दिमाग, जिगर से... या एप्रिलपासून दिग्दर्शन वामशी पेडिपल्ली यांच्यासोबत..." या पोस्टवर चाहते आणि कलाकार मंडळी कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. चाहते चित्रपटासाठी खूपच उत्सुक असल्याचे दिसत आहे.

सलमान खानचा तेलुगु डेब्यू

सलमानने २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गॉडफादर' (८) या ॲक्शन-थ्रिलर चित्रपटातून तेलुगू इंडस्ट्रीत धमाकेदार एन्ट्री घेतली. या चित्रपटात सलमान खानने चिरंजीवी आणि नयनतारा यांच्यासोबत काम केले होते. या चित्रपटात त्याने एका अत्यंत महत्त्वाच्या 'कॅमिओ' भूमिकेत काम केले होते. जो बॉलिवूड आणि टॉलीवूड यांच्यातील एक महत्त्वपूर्ण सहयोग ठरला. दिग्दर्शन वामशी यांनी प्रभास, ज्युनियर एनटीआर, महेश बाबू, राम चरण, अल्लू अर्जुन आणि विजय यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे.

'मातृभूमी' चित्रपट

सलमान सध्या 'मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस' या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठीही सज्ज आहे. या चित्रपटाचे पूर्वीचे नाव 'बॅटल ऑफ गलवान' असे होते. अपूर्व लाखिया यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपटात शौर्य, त्याग आणि जिद्दीचे एक तीव्र आणि प्रभावी चित्रण पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट १७ एप्रिल २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे बोले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT