Salman Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan: 'हे तुझं काम नाही..'; बिग बॉस २०च्या प्रीमियर शूटिंगदरम्यान सलमान खान संतापला, व्हिडिओ व्हायरल

Salman Khan: बिग बॉस २०च्या प्रीमियर शूटिंगदरम्यान सलमान खानचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. फोटोसाठी पोझ देताना कॅमेऱ्यासमोर आलेल्या व्यक्तीवर अभिनेता चिडल्याचे दिसत आहे.

Shruti Vilas Kadam

Salman Khan: टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय आणि वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस’चा २०वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘बिग बॉस २०’चा भव्य प्रीमियर ६ सप्टेंबर २०२६ रोजी होणार असून, त्याआधीच या शोची जोरदार चर्चा रंगली आहे. निर्मात्यांनी नवीन सीझनच्या आलिशान घराची झलक दाखवणारा व्हिडिओही नुकताच शेअर केला आहे. दरम्यान, शोचा होस्ट आणि बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानने मुंबईत प्रीमियर एपिसोडचे शूटिंग पूर्ण केले असून, सेटवरील त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

प्रीमियर शूटिंगदरम्यान सलमान खान पापाराझींसाठी फोटोला पोझ देत होता. यावेळी त्याने गडद निळ्या रंगाची डेनिम जीन्स, काळ्या रंगाचा फिटिंग टी-शर्ट आणि काउबॉय हॅट असा आकर्षक लूक केला होता. सलमानचा हा स्टायलिश अंदाज चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतानाच, सेटवरील एका प्रसंगामुळे तो चर्चेत आला आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये सलमान खान फोटोसाठी पोझ देत असताना अचानक एक व्यक्ती कॅमेऱ्यासमोरून जाताना दिसते. ही व्यक्ती बाजूने निघून जाण्याचा प्रयत्न करत होती, मात्र सलमानच्या नजरेत हा प्रकार आला. त्यानंतर अभिनेता स्पष्टपणे नाराज झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसते.

सलमान खानने त्या व्यक्तीला फटकारत, “पापा, हे तुझं काम नाही, पापा...” असे म्हटल्याचे ऐकू येते. त्यानंतर तो म्हणतो, “हे तुझं काम नाही, पापा. कॅमेऱ्यासमोर येण्याची काहीच गरज नाही,” अशा शब्दांत त्याने नाराजी व्यक्त केली. या घटनेपूर्वी पापाराझी सलमानचे लक्ष वेधून घेण्यासाठी मोठ्याने आवाज देत होते. मात्र, सलमान चिडल्यानंतर वातावरण अचानक शांत झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसते.

‘बिग बॉस २०’चा प्रीमियर आता अवघ्या काही तासांवर आला असून, शोसोबतच सलमान खानच्या या व्हायरल व्हिडिओचीही जोरदार चर्चा रंगली आहे. 'बिग बॉस'च्या घराची पहिली झलकही समोर आली आहे. लवकरच या शोमध्ये कोण असणार आहे ते देखील समजेल.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ३००० रुपये जमा होणार? दिवाळीआधी सरकार घेणार मोठा निर्णय; वाचा सविस्तर

Maharashtra News Live Update: पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीमध्येच संघर्ष

ICE Facial : बर्फाच्या पाण्याने फेशिअल करताय? 'हे' ६ फायदे जाणून घ्या

Abhijeet Dipke : 'माझ्या अटकेची तयारी सुरू'; मध्यरात्री पत्रकार परिषद घेऊन अभिजीत दिपकेंचा खळबळजनक दावा

Maharashtra Rain Alert: पुणे, सोलापूरसह १० जिल्ह्यांत तुफान पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून 'यलो अलर्ट' जारी

SCROLL FOR NEXT