Salman Khan Gifted His Lucky Charm Instagram @beingsalmankhan
मनोरंजन बातम्या

Salman Khan and Aamir Khan Eid Celebration: आमिरच्या हातात दिसले सलमानचे ब्रेसलेट; काय आहे जांगडगुत्ता?

Salman Khan Gifted His Lucky Charm To Aamir: सलमानचे ब्रेसलेट आणखी एका बड्या अभिनेत्या हातात दिसले आहे.

Pooja Dange

Salman Khan and Aamir Khan celebrate Eid together: भाईजान सलमान खानचा लकी चार्म आपल्याला सर्वांना माहीतच आहे. सलमानचं निळ्या खड्याचं ब्रेसलेट तुम्ही देखील अनेकदा पाहिलं असेल. सलमान चित्रपट किंवा जाहिरात करताना देखील ते ब्रेसलेट काढत नाही. त्या ब्रेसलेटशिवाय तो कुठेच जात नाही.

सलमानला जर एखादी व्यक्ती आवडली तर तो त्याच्या ब्रेस्लेटसारखे सेम ब्रेसलेट त्या व्यक्तीला गिफ्ट करतो. सलमान त्या ब्रेस्लेटला लकी चार्म मानतो.

सलमानच्या हातातील ते ब्रेसलेट त्याच्या करिअरच्या सुरुवातीला त्याचे वडील सलीम खान यांनी दिले होते. तेव्हापासून सलमान खान ते ब्रेसलेट नेहमी घालतो. आता तुम्ही म्हणाल त्याच्या ब्रेसलेटची चर्चा आता का? तर सलमानचे ब्रेसलेट आणखी एका बड्या अभिनेत्या हातात दिसले आहे.

यावेळी जेव्हा सलमान ईदच्या शुभेच्छा द्यायला गॅलेक्सीच्या बालकांची आला तेव्हा त्याच्या हातात त्याच्या ब्रेसलेट नव्हते. त्यानंतर ते ब्रेसलेट दिसले ते मिस्टर परफेशनिस्ट आमिर खानच्या हातात. आमिरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ ईद दरम्यानचा आहे.

आमिर पापाराझींसमोर आला तेव्हा त्याच्या हातात सलमान खानचं ब्रेसलेट दिसलं. आमिरच्या हातातून ते सरकत होते. ते व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत असताना सगळ्यांची नजर त्या ब्रेसलेटवर गेली. आमिरने अनेकदा ते ब्रेसलेट सांभाळताना दिसला.

आमिर खान रात्री उशिरा अर्पिता शर्माच्या ईद पार्टीला गेला होता. तेव्हा त्याने हे ब्रेसलेट घातले होते. मात्र, सलमान खानने आमिर खानला नवीन ब्रेसलेट भेट दिल्याचेही समजते. सलमानने रात्री उशिरा आमिरसोबतचा एक फोटोही शेअर केला आणि सर्वांना चांद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या.

मात्र, हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता ही जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार असल्याचा अंदाज चाहत्यांनी व्यक्त केला आहे. सोशल मीडिया यूजर्सचा असा विश्वास आहे की सलमान आणि आमिर एका प्रोजेक्टमध्ये एकत्र दिसतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EVM Recounting: 8 महिन्यानंतर खडकवासल्यात फेरमतमोजणी, VVPAT मधील व्होटर स्लिप गहाळ ?

Crime News: मुंबईच्या २४ वर्षीय महिलेवर दुबईत सामूहिक बलात्कार; ५ सहकाऱ्यांच्या वासनेची बळी पडली

Maharashtra Politics: फडणवीस करणार मंत्रिमंडळाची साफसफाई, मंत्रिमंडळात फेरबदल, 8 विकेट पडणार?

Maharashtra Politics: यापुढे माझ्या अध्यक्षतेखाली बैठका घ्या! राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यावर शिरसाट संतापले

पालकांनो मुलांना सांभाळा,12 व्या मजल्यावरून पडून चिमुकलीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT