‘केजीएफ’चे दिग्दर्शक प्रशांत नील यांच्या ‘सालार’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. चित्रपट उद्या (२२ डिसेंबर) रिलीज होणार आहे. चित्रपटामध्ये प्रेक्षकांना धडाकेबाज ॲक्शन, अफलातून ड्रामा आणि हटके कथानक असा मिलाप प्रेक्षकांना या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. पण जरीही असं असलं तरी, सेंट्रल बोर्डाने या चित्रपटाला 'ए' सर्टिफिकेट दिलं आहे. चित्रपटाला मिळालेल्या सर्टिफिकेटमुळे दिग्दर्शक नाराज आहेत.
दिग्दर्शक प्रशांत नील यांनी चित्रपटाला ए सर्टिफिकेट मिळाल्यामुळे नाराज आहेत. 'आदिपुरुष'नंतर प्रभास 'सालार' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रभासच्या या आगामी चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा आहे. 'सालार पार्ट-1 सीझफायर'ला सेंट्रल बोर्डाकडून मिळालेल्या सर्टिफिकेटबद्दल आपली नाराजी व्यक्त केली आहे. "चित्रपटामध्ये दोन मित्रांची कथा दाखवली आहे. मला माहित आहे, हिंसाचारासोबत अश्लील किंवा असंवेदनशील आशय चित्रपटामध्ये नाही. ही सर्व आवश्यक हिंसा 'सालार'मध्ये एकत्रित केली आहे." असं दिग्दर्शक प्रशांत नीलने सांगितले. (Tollywood)
चित्रपटाच्या कथेबद्दल सविस्तर सांगताना प्रशांत यांनी प्रभासच्या भूमिकेविषयीही सांगितले, "चित्रपटामध्ये प्रभासला आम्ही संसारिक गोष्टींमध्ये आवड नसलेला व्यक्ती दाखवला आहे. पण त्याच्या समोर येणारी परिस्थिती त्याला त्या गोष्टी करण्यास भाग पाडते. चित्रपटाला 'U/A' सर्टिफिकेट मिळावे यासाठी सेन्सॉर बोर्डाने सीन्सवर कात्री चालवण्यास सांगितले होते. त्यातले बरेचसे सीन्स कमी करण्याची तयारी होती, पण त्यामध्येही काही सीन्सची आवश्यक होते. हे सीन्स काढले तर चित्रपटाच्या कथेशी तडजोड झाली असती. प्रभासला सर्वच वयोगटातील फॅन्स फॉलो करतात. पण हा चित्रपट १८ पेक्षा कमी वय असलेले फॅन्स हा चित्रपट पाहू शकणार नाहीत. म्हणून आम्ही 'ए' सर्टिफिकेटसाठी तयार झालो." असं दिग्दर्शकाने सांगितले. (Film Director)
'सालार पार्ट-1 सीझफायर'ची कथा दोन भागांमध्ये विभाजित केली आहे. एका काल्पनिक शहरामध्ये चित्रपटाची शुटिंग केली आहे. प्रशांत नील दिग्दर्शित 'सालार पार्ट-1 सीझफायर' ची निर्मिती होंबाळे फिल्सच्या बॅनरखाली केली आहे. २२ डिसेंबरला चित्रपट रिलीज होणार असून हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नडमध्ये हा चित्रपट रिलीज होत आहे. चित्रपटामध्ये प्रभास, पृथ्वीराज सुकुमारन, श्रृती हासन, बॉबी सिम्हा आणि जगपती बाबू प्रमुख भूमिकेत आहेत. (Entertainment News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.