Har Har Mahadev Movie Facing Trouble Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sakal Maratha Samaj: पिंपरी-चिंचवडनंतर आता सोलापुरातही 'हर हर महादेव' चित्रपटचा शो बंद

सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी प्रेक्षकांची माफी मागून चित्रपटाचा सुरू असलेला शो थांबवला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Har Har Mahadev: ऐतिहासिक चित्रपटामध्ये इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखवला जात आहे, अशी भूमिका काल संभाजीराजे यांनी घेतली होती. तसेच त्यांनी 'हर हर महादेव' आणि 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटावर आक्षेप देखील घेतला. त्यांच्या या भूमिकेला मराठा क्रांती मोर्चानंतर आता सकल मराठा समाजाने देखील पाठिंबा दिला आहे.

सोलापुरात 'हर हर महादेव' चित्रपटाचा शो सकल मराठा समाजाने बंद पडला आहे. सोलापुरातील 'इ स्क्वेअर मल्टिप्लेक्स'मध्ये 'हर हर महादेव' या चित्रपटाचा शो सुरू होता. सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी प्रेक्षकांची माफी मागून चित्रपटाचा सुरू असलेला शो थांबवला. चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या १९ प्रेक्षकांच्या तिकिटाचे ही पैसे त्यांनी परत करायला लावले. छत्रपती संभाजीराजेंनी घेतलेल्या भूमिकेनंतर सोलापुरात तीव्र पडसाद उमटले आहेत. थिएटर व्यवस्थापकाला निवेदन देऊन यापुढे असे चित्रपट न दाखवण्याची विनंती सुद्धा सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. (Movie)

'हर हर महादेव' या चित्रपटाला अमोल मिटकरी यांनी आक्षेप नोंदवला होता. रविवारी पत्रकार परिषद घेऊन संभाजी महाराज यांनी दोन ऐतिहासिक चित्रपटांवर आक्षेप नोंदवला आहे. 'हर हर महादेव' चित्रपटामध्ये चुकीच्या गोष्टी दाखवून इतिहासाचा विपर्यास केला असल्याचे संभाजीराजे यांनी म्हटले आहे. तसेच महेश मांजरेकर यांचा 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटसाठी घेतलेले कलाकार भूमिकेला शोभत नाहीत, चुकीचा इतिहास दाखवलात तर चित्रपट बंद पाडू, असे संभाजीराजे यांनी म्हटले होते. (Sambhaji Raje)

संभाजीराजांच्या या भूमिकेला आता विविधा स्तरातून पाठिंबा मिळत आहे. आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी 'हर हर महादेव' या चित्रपटाचे शो बंद करण्यात आले आहे. आता चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : वाशिम जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

Maharashtra Live News Update : बीडमध्ये क्लासेसमधील मुलींचे लैंगिक छळ प्रकरण; दुसरा गुन्हा दाखल

Harbour Line : हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत; रविवारच्या दिवशी प्रवाशांचे मेगा हाल

Ashadh Wari: विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल" जयघोषात पुण्याचे प्रतिपंढरपूर भक्तिरसात न्हालं|VIDEO

Early Morning Dreams: सकाळी पडणारे स्वप्न खरंच पूर्ण होतात का?

SCROLL FOR NEXT