Bichadna Song Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bichadna Song: दो दौर एक रास्ता...; 'सैयारा' फेम गायकाचं 'बिछडणं' हे डोळ्यात अश्रू आणणारं नवीन गाणं प्रदर्शित

Bichadna New Song: ‘सैयारा’ फेम फहीम अब्दुल्ला याचे ‘बिछडणं’ हे आदिल झफर खान आणि रीम शेख यांच्यावर चित्रित नविन गाणं प्रदर्शित झालं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bichadna New Song: ‘सैयारा’ फेम फहीम अब्दुल्ला याने भूषण कुमार आणि टी-सिरीजसोबत 'बिछडणं' एक सशक्त, थेट आणि भावनांनी भरलेलं नविन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आणलं आहे. हे गाणं हरवलेल्या प्रेमाचं दुःख व्यक्त करतं. आदिल झफर खान आणि रीम शेख यांची या गाण्यात प्रमुख भूमिका असून हे गीतं प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणेल.

हार्ड रॉकच्या अंगाने जाणारी कंपोझिशन, फहीमचा आवाज आणि संगीत तुमचं लक्ष शेवटच्या ओळीपर्यंत खिळवून ठेवतो. प्रत्येक ओळीत आणि सुरात आयुष्याचं एक खरं क्षण उमटलेलं जाणवतं. ट्रू मेकर्सच्या दिग्दर्शनात, व्हिडिओ दोन जन्मांतील प्रेमकथेचा प्रवास दाखवतो. प्रेम आणि विरहाच्या सीमारेषांवरची एक थरारक सफर. आदिल झफर खान आणि रीम शेख यांचं सशक्त सादरीकरण मनाला भिडतं.

फहीम अब्दुल्ला म्हणाला, बिछडणं’ खूप अस्थिर आणि भावना भरलेल्या अवस्थेतून जन्मलेलं गाणं आहे. सगळं एका जाममध्ये घडलं. हे थांबवायचंच नव्हतं. भूषण सर आणि टी-सिरीजचे मनापासून आभार की त्यांनी याला पूर्ण मोकळीक दिली.”

संगीतकार अमीर यांचे शब्द मनावर खोलवर परिणाम करतात. अशा भावना जागृत करतात ज्या बर्‍याचदा न सांगितलेल्या राहतात. ‘बिछडणं’ सध्या टी-सिरीजच्या यूट्यूब चॅनेलवर आणि सर्व प्रमुख म्युझिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहे.

Pancreatic Cancer Symptoms: पॅन्क्रियाटिक कॅन्सरची लक्षणं वेळीच ओळखा अन् तुमचा जीव वाचवा

स्मृती मानधनाला पलाश धोका देतोय? लग्न पुढे ढकलण्याचे कारण काय? फ्लर्टी चॅट्स व्हायरल

Famous Director : प्रसिद्ध डायरेक्टरची मोठी गुंतवणूक; पॉश एरियात ५ प्रापर्टी केल्या खरेदी, किती कोटींमध्ये झाली डील?

Maharashtra Live News Update : अयोध्येत ध्वजारोहण सोहळ्याला सुरुवात

PF चे पैसे ATM मधून काढता येणार; कधीपासून सुरु होणार EPFO 3.0? अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT