Saiyaara Box Office Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Saiyaara Box Office Collection : 'सैयारा'ची वीकेंडला छप्परफाड कमाई, 3 दिवसांत केलं बजेट वसूल

Saiyaara Box Office Collection Day 3 : सध्या बॉक्स ऑफिसवर प्रेमाचे वारे वाहताना दिसत आहे. 'सैयारा' चित्रपटाने तीन दिवसांत बंपर कमाई केली आहे. एकूण कलेक्शन जाणून घेऊयात.

Shreya Maskar

सध्या बॉक्स ऑफिसवर 'सैयारा' (Saiyaara) चित्रपटाचा डंका पाहायला मिळत आहे. तीन दिवसांत चित्रपटाने थिएटरमध्ये धुमाकूळ घातला आहे. 'सैयारा'चित्रपटा 18 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री अनीत पड्डा (Aneet Padda) आणि अभिनेता अहान पांडे (Ahaan Panday) एकत्र झळकले आहेत.

'सैयारा' चित्रपटातील त्यांच्या केमिस्ट्रीची चर्चा सर्वत्र पाहायला मिळत आहे.'सैयारा' ही एक प्रेमकथा आहे. 'सैयारा' ने तीन दिवसांत चित्रपटाचे बजेट वसूल केले असून अनेक मोठ्या चित्रपटांना कलेक्शमध्ये मागे टाकले आहे. चित्रपटाने तीन दिवसांत किती कोटी कमावले (Saiyaara Box Office Collection Day 3) जाणून घेऊयात.

'सैयारा' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 3

  • दिवस पहिला - 21 कोटी रुपये

  • दिवस दुसरा - 25 कोटी रुपये

  • दिवस तिसरा - 37 कोटी रुपये

  • एकूण - 83 कोटी रुपये

बजेट वसूल

मीडिया रिपोर्टनुसार, 'सैयारा' चित्रपटाचे बजेट 40 ते 60 कोटींच्या दरम्यान आहे. त्यामुळे रिलीजच्या 3 दिवसांत 'सैयारा' चित्रपटाने आपले बजेट वसूल केले आहे.

'सैयारा'ने तिसऱ्या दिवशी 'या' चित्रपटांना मागे टाकले

  • सिंघम अगेन - 35.75 कोटी रुपये

  • भूल भुलैया 3 - 35. 5 कोटी रुपये

  • हाऊसफुल 5- 32.5 कोटी रुपये

  • आरआरआर - 31. 5 कोटी रुपये

  • चेन्नई एक्सप्रेस - 32. 5 कोटी रुपये

  • स्काय फोर्स - 28 कोटी रुपये

  • फायटर - 27.5 कोटी रुपये

  • दृश्यम 2- 27.17 कोटी रुपये

  • सितारे जमीन परने - 27 कोटी रुपये

  • कल्कि 2898 एडी - 26 कोटी रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डिसीपीच्या गाडीलाच ठोकलं

पुण्यात मद्यधुंद चालकाचा प्रताप! थेट वाहतूक विभागाच्या डीसीपींच्या गाडीला धडक; मुलगी जखमी

Mrunal-Bipasha: मृणाल बिपाशाच्या वादात हिना खानची एन्ट्री; अभिनेत्री म्हणाली, 'मी अशा चुका केल्या...'

Mumbai Local Mega Block : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक, एक्सप्रेस गाड्यांचा खोळंबा, लोकलवरही परिणाम

भारताला धमकावणारे ट्रम्प रशियाच्या पुतिनसमोर शांत; 'पीसमेकर' प्रतिमेला धक्का, भेटीचा VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT