Saiyaara worldwide collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Saiyaara worldwide collection : 'सैयारा' सुसाट! बॉक्स ऑफिसवर जादू कायम, वर्ल्डवाइड कलेक्शन 400 कोटींपार

Saiyaara Box Office Collection Day 12 : अहान पांडे आणि अनीत पड्डाच्या केमिस्ट्रीनं जगभरात वेड लावले आहे. चित्रपटाने १२ दिवसांत बॉक्स ऑफिसवर किती कोटींचा व्यवसाय केला, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

अहान पांडे आणि अनीत पड्डा यांनी बॉक्स ऑफिसवर जादू केली आहे.

'सैयारा' 18 जुलैला रिलीज झाला आहे.

'सैयारा'ने जगभरात 400 कोटींचा टप्पा पार केला आहे.

अहान पांडे (Ahaan Panday) आणि अनीत पड्डा (Aneet Padda) बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. त्यांच्या केमिस्ट्रीची चर्चा सध्या सोशल मिडियावर चांगलीच रंगली आहे. चित्रपट पाहून प्रेक्षक ढसाढसा रडताना दिसत आहे. 'सैयारा' (Saiyaara) 18 जुलैला रिलीज झाला आहे. 'सैयारा'चे दिग्दर्शन मोहित सूरी यांनी केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'सैयारा' चित्रपटाचे बजेट 40 ते 60 कोटींच्या दरम्यान आहे. चित्रपटाने जगभरात किती कोटींचा गल्ला जमावला, जाणून घेऊयात.

'सैयारा' चित्रपटाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. लवकरच 'सैयारा' चित्रपट 500 कोटींचा टप्पा ओलांडणार आहे. 'सैयारा' चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 172.75 कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाने अंदाजे 74.5 कोटी रुपये कमावले आहेत. 'सैयारा' ने 12 दिवसांत जगभरात 404 कोटींचा गल्ला जमावला आहे. चित्रपटाने 12व्या दिवशी किती कोटींचा व्यवसाय केला जाणून घेऊयात.

'सैयारा' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 12

  • पहिला दिवस - 21 कोटी रुपये

  • दुसरा दिवस - 26 कोटी रुपये

  • तिसरा दिवस - 37.75 कोटी रुपये

  • चौथा दिवस - 24 कोटी रुपये

  • पाचवा दिवस - 25 कोटी रुपये

  • सहावा दिवस - 21 कोटी रुपये

  • सातवा दिवस - 15.13 कोटी रुपये

  • आठवा दिवस - 18 कोटी रुपये

  • नववा दिवस - 26.5 कोटी रुपये

  • दहावा दिवस - 30 कोटी रुपये

  • अकरावा दिवस - 9.25 कोटी रुपये

  • बारावा दिवस - 9.5 कोटी रुपये

  • एकूण - 266 कोटी रुपये

'सैयारा' रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

'सैयारा' चित्रपटाने 12 दिवसांत अनेक मोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहे. 'सैयारा' चे कलेक्शन दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अहान पांडेच्या 'सैयारा' चित्रपट विकी कौशलच्या 'छावा' सिनेमाला तगडी टक्कर देत आहे. 'सैयारा'ने 12 व्या दिवशी अनेक चित्रपटांना मागे टाकले आहे. यात बजरंगी भाईजान, कबीर सिंग , संजू, टायगर जिंदा है, तानाजी, पठाण आणि केजीएफ चॅप्टर २ यांचा समावेश आहे.

'सैयारा' कधी रिलीज झाला?

18 जुलै

'सैयारा'चे जगभरात कलेक्शन किती?

400 कोटींच्या वर

'सैयारा'ची स्टारकास्ट कोण?

अहान पांडे - अनीत पड्डा

'सैयारा'चे दिग्दर्शक कोण?

मोहित सूरी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT