Chhaya Kadam  Instagram @chhaya.kadam.75
मनोरंजन बातम्या

Sairat Fame Marathi Actress : सैराट फेम अभिनेत्री छाया कदम यांना मातृशोक; सोशल मीडियावर भावुक पोस्ट केली शेअर

Chhaya Kadam: छाया कदम यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांची आई त्यांच्यापासून कायम दूर गेल्याचे सांगितले आहे.

Pooja Dange

Actress Chaya Kadam Lost Her Mother:

सैराट, न्युड, सरला एक कोटी मराठीत गाजलेल्या चित्रपटांसह बॉलीवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या अभिनेत्री छाया कदम यांच्या आईचे निशाण झाले आहे.

छाया कदम यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांची आई त्यांच्यापासून कायम दूर गेल्याचे सांगितले आहे. छाया कदम यांच्या आईचे निधन दोन आठवड्यापूर्वीच झाले आहे.

छाया कदम यांनी पोस्ट करत लिहिले आहे की, 'आई आज दोन आठवडे झाले तुला जाऊन? नाही अगं, तू आहेस आणि असशील. कायमच माझ्यासोबत. तू असशील मुंबईतल्या घरातील तू जपलेल्या समई आणि जात्यात. तू असशील गावातल्या अंगणातील चाफ्याच्या झाडात. आणि तू असशील, तूच मला दिलेल्या प्रत्येक स्वातंत्रात आणि माझ्या कामात. मिस यू मम्मुडी. लव्ह यू मम्मुडी !' (Latest Entertainment News)

या कॅप्शनसह छाया कदम यांनी त्यांच्या आईसोबतचा एक फोटो देखील शेअर केला आहे. अभिनेत्री ईशा केसकर आणि अश्विनी कासार यांनी छाया यांच्या आईला कमेंट करत श्रद्धांजली देखील वाहिली आहे.

दोन आठवड्यांपूर्वी छाया यांनी त्यांची आई गमावली. त्यांनी या फोटोमधून त्यांच्या आईच्या आठवणी शेअर केल्या आहेत. छाया यांनी लिहिलेली आईसोबतची आठवण यादी शेअर देखील केली आहे. छाया यांच्या आईसोबत समई पुसताना, गावाच्या घरामधील फोटो शेअर केले आहेत.

छाया गेली अनेक वर्ष अभिनय क्षेत्रात काम करत आहेत. मराठी, हिंदीमधील सैराट, न्युड, झुंड, गंगुबाई काठियावाडी, फॅन्ड्री यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. (Movie)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT