Saif Ali Khan  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Saif Ali Khan: सैफ अली खानवर आणखी एक संकट, १५ हजार कोटींची संपत्ती जप्त होणार?

Saif Ali Khan Property: मध्य प्रदेश हायकोर्टने अभिनेता आणि त्याच्या कुटुंबीयांना मालमत्तेवर दावा सादर करण्यासाठी ३० दिवसांची मुदत दिली होती. पण आता ही मुदत संपली आहे. त्यामुळे या संपत्तीवर टाच देण्याची शक्यता आहे.

Priya More

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर काही दिवसांपूर्वी चाकू हल्ल्याची घटना घडली होती. लीलावती रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. आजच त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. या धक्कातून सावरत नाही तोवर सैफ अली खानचे टेन्शन वाढले आहे. नवाब पतौडी यांचे वारसदार सैफ अली खान यांची १५ हजार कोटी रुपयांची संपत्ती मध्य प्रदेश सरकार ताब्यात घेण्याची शक्यता आहे.

भोपाळ संस्थानाच्या ऐतिहासिक भूमीवरील शत्रू संपत्ती प्रकरणात गेल्या १० वर्षांपासून सुरू असलेली स्थगिती आता संपुष्टात आली आहे. मध्य प्रदेश हायकोर्टने अभिनेता आणि त्याच्या कुटुंबीयांना मालमत्तेवर दावा सादर करण्यासाठी ३० दिवसांची मुदत दिली होती. पण आता ही मुदत संपली आहे. त्यामुळे सैफ अली खानची भोपाळमधील तब्बल १५ हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त होऊ शकते.

मध्य प्रदेशच्या हायकोर्टामध्ये सैफ अली खानच्या मालमत्तेविरोधात शत्रू संपत्तीचा खटला सुरू आहे. या प्रकरणी हायकोर्टाने सैफ अली खान, त्याची आई शर्मिला टागोर, बहीण सोहा आणि सब अली खान आणि पतौडीची बहीण सबिहा सुलतान यांना शत्रूच्या मालमत्तेच्या प्रकरणात अपीलीय अधिकाऱ्यांसमोर आपली बाजू मांडण्याचे आदेश दिले होते. यासाठी त्यांना ३० दिवसांचा कालावधी दिला होता. पण ३० दिवसांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही कुटुंबातील एकाही सदस्याने मालमत्तेवर आपला हक्क मांडला नाही. अशा स्थितीत राज्य सरकार त्यांच्या मालकीची जमीन जप्त करू शकते.

सैफ अली खानच्या कुटुंबाची १५ हजार कोटींची संपत्ती भोपाळच्या कोहेफिजा ते चिक्लोडपर्यंत पसरलेली आहे. ही मालमत्ता सैफ अली खान आणि शर्मिला टागोर यांच्या कुटुंबाची असल्याचे सांगितले जात आहे. पतौडी कुटुंबाच्या सुमारे १०० एकर जमिनीवर दीड लाख नागरिक राहतात. परंतू ही मालमत्ता शत्रू संपत्तीच्या श्रेणीत ठेवण्यात आली आहे.

दरम्यान, शत्रूची मालमत्ता म्हणजे ज्या लोकांनी भारत-पाकिस्तान फाळणी किंवा भारत-चीन युद्धानंतर भारतीय नागरिकत्व सोडले. ती संपत्ती शत्रू मालमत्ता म्हणून गणली जाते. भोपाळ संस्थानातील नवाब हमीदुल्ला खान यांची मोठी मुलगी आबिदा सुलतान पाकिस्तानात गेली होती. यामुळे कौटुंबिक मालमत्ता शत्रू मालमत्ता म्हणून ठेवली जात आहे. आता ही जमीन सरकारला ताब्यात घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, पतौडी कुटुंबाकडे अजूनही डिव्हिजन बेंचमध्ये आव्हान दाखल करण्याचा पर्याय आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एकाची मराठीसाठी तळमळ, दुसऱ्याची खुर्चीसाठी मळमळ; एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंसाठी सॉफ्ट कॉर्नर

Eknath Shinde: दाढीवरून अर्धाच हात फिरवला, पूर्ण फिरवला असता तर...; ठाकरेंच्या पुष्पा स्टाइल टीकेवर एकनाथ शिंदेंचा पलटवार

Chocolate Brownie Recipe: स्नॅक्स टाइमसाठी झटपट बनवा माउथ वाटरिंग चॉकलेट ब्राउनी, नोट करा ही सोपी रेसिपी

Vijay Melava: राज-उद्धव ठाकरे एकत्र येताच संजय राऊतांचं मविआबाबत मोठं विधान

Sushil Kedia News : सुशील केडियाच्या ऑफिसची तोडफोड केल्यानंतर पहिलीच मोठी कारवाई; मनसे कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात, गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT