Saif Ali Khan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Saif Ali Khan: सैफवर हल्ला करणाऱ्याची ओळख पटली, याआधीही केला घरफोडीचा प्रयत्न, पोलिसांना कुणी दिली टीप?

Saif Ali Khan Attack Case : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करण्यात आला. यासंबंधित आता एक मोठी माहिती समोर आली आहे. हल्ला करणाऱ्या व्यक्तीने याआधी देखील घरफोडीचा प्रयत्न केला आहे. सविस्तर प्रकरण जाणून घ्या.

Shreya Maskar

गुरुवारी मध्यरात्री बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्याच्या घरात चोर आला आणि त्याच्याशी झालेल्या झटापटीत सैफ अली खान गंभीर जखमी झाला. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर इमारतीचे जिने उतरुन पळताना दिसला. त्याचा चेहरा इमारतीच्या कॅमेरात कैद झाला. पोलीसांनी पकडलेल्या संशयिताची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे.

आता या हल्ल्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सैफ अली खानच्या घरी चोरी करण्यासाठी आलेल्या संशयिताने ११ डिसेंबरच्या रात्री पूर्व उपनगरातील एका इमारतीत घुसण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान तो पकडला गेला आणि त्याचे काही फोटो समोर आले आहेत.

इमारतीत घरफोडीच्या उद्देशाने चोर गेला होता. तेव्हा त्याला सुरक्षा रक्षकांनी पकडले. त्यावेळी चौकशी केल्यावर त्याने तो डिलिव्हरी बॉय असल्याचे सांगून काही कागदपत्रे दाखवली. मात्र त्याची अधिक चौकशी झाल्यानंतर तो खोटे बोलत असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर त्याचे खोटं पकडले जाणार म्हणून आरोपीने स्वतःलाच मारले आणि वेड्यासारखा वागू लागला. तसेच तेथून पळ काढला. असे बोले जात आहे की, संशयिताला पकडण्यासाठी पोलिसांना एका मोठ्या व्यक्तीने टीप दिली आहे.

सैफ अली खान हेल्थ अपडेट

डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे, सैफची प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. त्याला शस्त्रक्रियेनंतर आयसीयूमध्ये स्पेशल रुममध्ये शिफ्ट करण्यात आले आहे. सैफ अली खानला आता विश्रांतीची गरज आहे. सैफ अली खानला आता लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार आहे. सोमवारपर्यंत सैफ अली खानला डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Schoking News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT