New Marathi Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Maharashtrachi Hasya Jatra टीम झळकणार नवीन चित्रपटात, प्रसाद, सई, वनिताची केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर, ‘गुलकंद चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

New Marathi Movie: मुरलेल्या प्रेमाचा गोडवा चाखवणारा ‘गुलकंद’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Manasvi Choudhary

मुरलेल्या प्रेमाचा गोडवा चाखवणारा ‘गुलकंद’ हा चित्रपट नवीन वर्षात १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाची सोशल माडियाद्वारे घोषणा करण्यात आली आहे. सचिन मोटे लिखित, सचिन गोस्वामी दिग्दर्शित या चित्रपटात फॅमिली एंटरटेनमेंट आणि कॅामेडीचे अनोखे कॅाम्बिनेशन पाहायला मिळणार आहे. यात सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत, शार्विल आगटे अशी तगडी स्टारकास्ट असणार आहे. ‘गुलकंद’चे सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाब्रिया निर्माते आहेत.

चित्रपटाचे नाव, भन्नाट टीम यामुळे प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. चित्रपटाबद्दल दिग्दर्शक, निर्माते सचिन गोस्वामी म्हणतात, ‘’या सगळ्यांसोबत मी आधी काम केलं असल्याने आमच्यात एक बॅाण्डिंग आहे आणि आमची हिच केमिस्ट्री यातही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट एक फॅमिली एंटरटेनर असून प्रेक्षकांना या मुरलेल्या गुलकंदाची चव चाखायला नक्कीच आवडेल. ही एक अशी कथा आहे, ज्याची लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच मजा घेऊ शकतात. ही अतिशय हृदयस्पर्शी कहाणी आहे.’’

निर्माते संजय छाब्रिया म्हणतात, ‘’चित्रपटाची कथा ऐकताक्षणी मला आवडली. मुळात ही एक मुरलेली टीम आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कमाल आहे. आजच्या धावपळीच्या जगात प्रेक्षकांना असे हलकेफुलके विषय पाहायला आवडतात. हा चित्रपट पाहून प्रेक्षक हसतमुखाने थिएटरबाहेर पडतील. आपल्या प्रियजनांसोबतच्या आठवणी जपण्यासाठी आमचा हा खास प्रयत्न आहे.’’

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Land Scam: ठाण्यात जमीन घोटाळा; २०० कोटींची जमीन ३ कोटीत लाटली, वडेट्टीवारांचा शिंदेंच्या मंत्र्यावर आरोप

Maharashtra Live News Update : राज्याचा पारा घसरला, पुण्यासह मुंबई गुलाबी थंडीने गारठले

Jupiter Retrograde 2025: 11 नोव्हेंबरपासून 'या' राशींची होणार बल्ले-बल्ले; गुरु वक्री होऊन देणार पैसा

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT