Medium Spicy Released On Amazon Prime Saam TV
मनोरंजन बातम्या

Marathi Movie On OTT : सई ताम्हणकर - ललित प्रभाकर यांचा मिडीयम स्पायसी चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित

Medium Spicy Released On OTT : सई ताम्हणकर - ललित प्रभाकर यांचा चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

Pooja Dange

Medium Spicy Released On Amazon Prime : गेल्या वर्षभरातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या मराठी चित्रपटांपैकी एक, मीडियम स्पायसीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. निर्मात्या विधि कासलीवाल आणि लँडमार्क फिल्म्स निर्मित हा पुरस्कार विजेता चित्रपटाला प्रेक्षकांचा मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेऊन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित करण्यात आला आहे.

ललित प्रभाकर, सई ताम्हणकर आणि पर्णा पेठे यांच्या प्रमुख भूमिका असलेला, नात्यांच्या गुंतागुंतीचा शोध घेणारी ही क्लासिक कथा गेल्या वर्षी रिलीज झाली.

खूप दिवसांपासून चाहते OTT प्लॅटफॉर्मवर या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते आणि त्यांची प्रतीक्षा अखेर या प्राइम व्हिडिओवरील रिलीजनंतर संपली आणि आता प्रत्येकजण घरी बसून या मिडियम स्पायसीचा आस्वाद घेऊ शकतो.

मीडियम स्पायसी व्यतिरिक्त, निर्मात्या विधी कासलीवालच्या उत्कृष्ट दिग्दर्शमध्ये 'विवाह', 'एक विवाह.. ऐसा भी' यांचा समावेश आहे . या चित्रपटनामध्ये तिने प्रतिभावान दिग्दर्शक सूरज बडजात्याला यांना असिस्ट केले होते.

तसेच तिने 'इसी लाईफ' लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे. विधि कासलीवालने 'एका सांगते' तसेच सचिन कुंडलकर दिग्दर्शित वजनादर, रिंगण, गच्ची आणि रेडू या सुंदर मराठी चित्रपटाची निर्मिती केली.

विधि कासलीवालने कामगारांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा 'ब्लॉक बाय ब्लॉक' ही डॉक्युमेंट्री आणि 'बिल्डिंग फॉर द फ्युचर' यासारख्या उल्लेखनीय चित्रपटांची निर्मितीही केली आहे. 'बिल्डिंग फॉर फ्युचर हा चित्रपट कॉर्पोरेट भारतातील वास्तू आणि अभियांत्रिकी प्रगतीचा शोध यावर आधारित आहे. मीडियम स्पायसीच्या माध्यमातून विधी एक निर्मात्या म्हणून पुढे आल्या आहेत.

OTT वर रिलीज झाल्यामुळे, प्रेक्षक देखील त्यांच्या कुटुंबियांसोबत चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. मोहित टाकळकर दिग्दर्शित, प्रतिभावान इरावती कर्णिक लिखित, अनिरुद्ध नाग आणि कार्यकारी निर्माते के. आर महादेवनच्या मार्केटिंगसह, मिडियम स्पायसी जीवनात संतुलन शोधण्याच्या दरम्यानचा मार्ग शोधते आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विधानपरिषदेच्या निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग; राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणाला संधी मिळणार? ४ जणांची नावे चर्चेत

Maharashtra News Live Update: मरीन ड्राइव्हवर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

Pune : पुण्यात चाललंय काय? महिला पोलीस अधिकाऱ्याचा सासरच्या मंडळीकडून छळ अन् मारहाण, ६ जणांविरुद्ध गुन्हा

Aloe Vera And Coconut Oil Hair Mask: कोरफडमध्ये 'हे' तेल मिक्स करून लावा, केस होतील सिल्की आणि शायनी

Crime news: झोपेत पाय लागल्याने तरुण भडकला; डोक्यात दगड घालून मजुराची हत्या, सोलापुरात खळबळ

SCROLL FOR NEXT