मुंबई : साउथ सिनेसृष्टीतील रावडी बेबी साई पल्लवी (Sai Pallavi) ही नुकत्याच रीलीज झालेल्या 'विराट पर्वम'(Virata Parvam) च्या यशाचा आनंद लुटत आहे. या चित्रपटात ती 'बाहुबली' चित्रपटातील भल्लालदेव म्हणजेच राणा डग्गुबातीसोबत (Rana Daggubati) दिसली होती. या चित्रपटातील दोघांच्या अभिनयाला प्रेक्षकांचे भरघोस प्रेम मिळाले आहे. मधल्या काळामध्ये साई पल्लवी एका वक्तव्यामुळे वादात सापडली होती. दुसरीकडे, या अभिनेत्रीच्या अभिनयाचे कौतुक सुरूच होते. काही दिवसांपूर्वी, तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान साई पल्लवीने काश्मिरी हिंदूंच्या मुद्द्यावर भाष्य केले होते. त्यानंतर तिच्यावर टीका झाली होती. तिने दिलगिरी व्यक्त केल्यानंतर हे प्रकरण निवळले होते.
साई पल्लवीने अलीकडेच एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत लहानपणीचा एक मजेदार किस्सा सांगितला होता. तिने शाळेतील एका मुलाला प्रेम पत्र लिहिल्याचे तिच्या पालकांना कळल्यानंतर त्यांनी तिला खूप मारल्याचे साई पल्लवीने सांगितले होते. साई पल्लवीने तिच्या जुन्या आठवणींना उजाळा देत सांगितलेल्या या आठवणीमुळे तिने लाखो नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत. किशोरवयात प्रेमात पडलेल्या अनेक मुलांसोबत अशा घटना घडत असतात. प्रेमपत्राद्वारे एकमेकांवरचे प्रेम व्यक्त करण्यामुळे अनेक मुलांनी आपल्या पालकांचा मार खाल्ला आहे.
साई पल्लवीने सांगितले की, प्रेम पत्राच्या प्रकरणावरून तिला पहिल्यांदा तिच्या पालकांनी फटकारले आणि त्यानंतर तिने कधीही कोणाला पत्र पाठवण्याचं धाडस केलं नाही. प्रेम पत्रावरून तिला तिचे पालक असे ओरडले की, तिने पुन्हा अशी चूक करण्याचा प्रयत्न कधीच केला नाही. त्याचवेळी हाच प्रश्न तिचा सहकलाकार राणा डग्गुबातीला विचारला असता, त्याने सांगितले की, त्यांने लहानपणी त्याचे दिवंगत आजोबा डग्गुबाती रामनायडू यांना पत्र लिहिले होते. त्यानंतर त्याने कधीच कोणालाही पत्र लिहिले नाही.
साई पल्लवीने 'विराट पर्वम'मध्ये वेनेलाची भूमिका साकारली होती. जी राणा दग्गुबातीला पत्र पोहोचवण्याचा प्रयत्न करत आपला जीव धोक्यात घातले. खऱ्या आयुष्यातही त्याने असेच केले आहे का, असे विचारले असता, तिने बालपणीचा हा मजेदार किस्सा सांगितला आणि सांगितले की खऱ्या आयुष्यात फक्त एकदाच एक पत्र लिहिले होते. ते एका मुलासाठी होते. त्यावेळी अभिनेत्री सातवीत होती. आता साई पल्लवी 'गार्गी' या तिच्या आगामी चित्रपटाची तयारी करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.