sai ketan rao vs luv katria Fight in Bigg Boss OTT 3 : बिग बॉसच्या घरात स्पर्धक साई केतन राव आणि लव कटारिया यांच्यात तुफान राडा झाला. यांच्यातला वाद चिघळून प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचलं होतं. SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss OTT 3: बिग बॉसच्या घरात राडा, माईक, खुर्ची फेकली; पार मारामारीपर्यंत गेले, २ VIDEO बघा सगळी भानगड लक्षात येईल!

Sai Ketan Rao vs luv Kataria Fight : बिग बॉस ओटीटी ३ मध्ये साई केतन राव आणि लव कटारिया यांच्यात तुफान राडा बघायला मिळाला. या दोघांमध्ये झालेली बाचाबाची शिवीगाळपर्यंत पोहोचली. इतकंच काय तर हे दोघे मारामारीवर आले होते.

Nandkumar Joshi

बिग बॉस ओटीटी ३ च्या घरात स्पर्धकांमध्ये तुफान राडा झाला. अरमान मलिक यानं विशाल पांडेच्या कानशि‍लात लगावली होती, त्याची आठवण या प्रकरणामुळं झाली. साई केतन राव आणि लव कटारिया यांच्यात जोरदार भांडण झालं. खुर्च्या आणि माईक फेकला. तसेच एकानं तर आपल्या अंगावरील शर्ट काढलं. ते दोघे एकमेकांच्या अंगावर धावूनही गेले.

रणवीर शौरीनं मध्यस्थी केली नसती तर लव कटारिया आणि साई केतन राव यांच्यात मारामारी झाली असती इतका हा वाद चिघळला होता. लव कटारिया आणि साई केतन राव यांच्यात इतक्या टोकाची लढाई का झाली याचं कारणही समोर आलं आहे.

लव आणि साईमध्ये काय झालं?

बिग बॉसच्या घरात एका मुद्द्यावर चर्चा सुरू होती. साई केतन रावनं आपला मुद्दा मांडला. पण लव कटारिया ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. साई केतनला राग आला आणि त्यानं कटारियाला उद्देशून अपशब्द काढले. त्यावर लव कटारिया भडकला आणि साई केतनला शिवीगाळ केली. साईला राग अनावर झाल्यानंतर तो लव कटारियाच्या अंगावर धावून गेला.

वाद चिघळला

साई केतन राव आणि लव कटारिया यांनी एकमेकांना शिवीगाळ केल्याचं व्हिडिओमध्ये दिसतं. या दोघांमधला वाद चिघळला. हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचला होता. पण शौरीनं मध्यस्थी केली म्हणून पुढचा अनर्थ टळला. रणवीर शौरी, अरमान मलिक आणि घरातील इतर सदस्यांनी हस्तक्षेप केल्याचंही या व्हिडिओत दिसतं. पण सर्वांनी मध्यस्थी करूनही हा वाद काही मिटला नाही. त्यानंतरही हे दोघे एकमेकांना शिवीगाळ करत होते.

साईनं फेकली खुर्ची, यापूर्वीही कटारियासोबत जुंपली होती

एका व्हिडिओत अरमान मलिक आणि कृतिका यांनीही साई केतनला शांत करण्याचा प्रयत्न केला. त्याची समजूत काढल्याचं दिसतं. पण राग अनावर झालेला साई काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने खुर्ची फेकली. आता त्याच्यावर बिग बॉस काय कारवाई करतं हे बघावं लागेल. याआधीही लव कटारिया आणि साई केतन यांच्यात राडा झाला होता.

अरमान झाला हेड ऑफ द हाऊस, आता काही खरं नाही!

बिग बॉस तकच्या माहितीनुसार, अरमान मलिक हेड ऑफ द हाऊस झाला आहे. आता तो या बिग बॉसच्या घराचा कर्ताधर्ता असणार आहे. आपल्या मनासारखं काम तो इतर सदस्यांकडून करून घेणार आहे. आता अरमानच्या हातात अख्खं घर असल्यानं घरात फुल टू धमाल येणार असल्याचं सांगितलं जातं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरण, आज पुन्हा होणार सुनावणी

Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहि‍णी अपात्र, सरकार वसूली करण्याची शक्यता

Accident: देवघरमध्ये भाविकांवर काळाचा घाला, बस-ट्रकची समोरासमोर धडक; १८ जणांचा मृत्यू

Mangalwar Upay: मंगळवारच्या दिवशी शिवभक्तांनी हनुमानाचीही करावी पुजा; हे उपाय करणं ठरेल फायदेशीर

Pune Tourism : ट्रेकिंग,सायकलिंग अन् पक्षी निरीक्षण; पुण्यातील विरंगुळ्याचे बेस्ट ठिकाण

SCROLL FOR NEXT