Sara Tendulkar Net Worth SAAM TV
मनोरंजन बातम्या

Sara Tendulkar Net Worth: सचिन तेंडुलकरच्या लेकीची संपत्ती माहितेय?

Sachin Tendulkar Daughter : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा आपल्या एका स्माईलने चाहत्यांना भुरळ घालते. तिची एकूण संपत्ती आणि व्यवसायासंबंधी जाणून घ्या.

Shreya Maskar

भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरचे देखील लाखो चाहते आहेत. तिने तिच्या हिंमतीवर इंडस्ट्रीत नाव कमावलं आहे. सारा नेहमीच आपल्या फॅशनसाठी ओळखली जाते. तिने खूप कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे.

वैयक्तिक आयुष्य

साराचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. सारा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar ) ची मुलगी आहे. साराची आई डॉ.अंजली तेंडुलकरकडूनच तिला हेल्थची आवड लागली. साराचा धाकटा भाऊ अर्जुन तेंडुलकर देखील क्रिकेटर आहे. त्यामुळे सारा (Sara Tendulkar ) अनेक वेळा स्टेडियममध्ये स्पॉट होते. सारा सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकचे फोटो टाकत असते. तिच्या एका लूकवर लाखो चाहते फिदा होतात. तिचे इंस्टाग्रामवर 7.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. तिने स्वतःची एक वेगळी ओळख तयार केली आहे.

शिक्षण किती?

सारा तेंडुलकरने फॅशनचं शिक्षण घेतलं आहे. सारा एक सुंदर मॉडेल आहे. तिने तिच्या मॉडेलिंग करिअरची सुरूवात 2021 मध्ये Ajio Luxe मधून केली. तिने अनेक परदेशातील शो देखील केले आहेत. साराने आपलं शिक्षण लंडनच्या युनिव्हर्सिटीतून क्लिनिकल आणि पब्लिक हेल्थ न्यूट्रिशनमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.

मालमत्ता किती?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सारा तेंडुलकर50 लाख ते 1 कोटी रुपयांची मालकीण आहे. तिने कमी वयाच्या 26 व्या वर्षी साराने ऑनलाइन व्यवसाय सुरू केला आहे. साराचं 'शॉप' नावाचं ऑनलाइन स्टोअर आहे. तसेच ती भारतातील कोरियन ब्युटी ब्रँड Laneigeची ब्रँड ॲम्बेसेडर देखील आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Radhakrishna Vikhe Patil: विखेंचं शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ! कर्जमाफीवरून वादग्रस्त विधानानं पेटला वाद

Crime News : संतापजनक! क्लासवरून घरी येताना वाटेत गाठलं, ६ वर्षीय बालिकेवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार, नांदेड हादरलं

Maharashtra Politics: आदित्य ठाकरे मुंबईचे महापौर होणार? राजकीय चर्चांना उधाण|VIDEO

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाकडून संजय राऊत बरे होण्यासाठी महाआरतीचं आयोजन

Egg Safety Facts: अंडे का फंडा! अंडी फ्रिजमध्ये ठेवावीत की नाही?

SCROLL FOR NEXT