Hrithik Roshan, Saba Azad and Sussanne Khan saam tv
मनोरंजन बातम्या

हृतिक रोशन आणि सबा आझादची तुफान चर्चा; पॅरिसमधले फोटो पाहून सुजैन खानने केली मोठी कमेंट

हृतिक रोशन आणि सबा आझाद काही दिवसांपूर्वी पॅरिसला व्हेकेशनसाठी गेले होते, कारण...

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : अप्रतिम अभिनयाने आणि जबरदस्त नृत्यशैलीने बॉलिवूडमध्ये उमदा कलाकाराचा ठसा उमटवणारा अभिनेता म्हणजे (Hrithik Roshan) हृतिक रोशन. हृतिकच्या डान्स स्टाईलची आणि हॅंडसम लूकची चर्चा तर अवघ्या बॉलिवूडमध्ये सुरु असतेच. पण सध्या हृतिक रोशनची सिनेविश्वात वेगळीच चर्चा रंगली आहे. हृतिक रोशन आणि सबा आझाद यांच्यात असलेली केमेस्ट्री करण जोहरच्या ५० व्या वाढदिवसानिमित्ताने रेड कार्पेटवर दिसली. त्यानंतर सोशल मीडियावर यांच्यात सुरु असलेल्या रिलेशनशीपवरही अनेक तर्क-वितर्कांना उधाण आलं होतं. बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि सबा आझाद (Saba Azad) काही दिवसांपूर्वी पॅरिसला व्हेकेशनसाठी गेले होते.

पॅरिसला गेल्यावर दोघांनीही धमाल केली. पॅरिसच्या एका क्लबमध्ये दोघांनीही रोमॅंटिक पोज देत इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले. हृतिक-सबा जोडी 'ओह-सो-क्यूट' फोटोंसह चाहत्यांना आश्चर्याचा धक्का देण्याची कोणतीच संधी सोडत नाही. सबा आझादने काही नवीन फोटो तिच्या इन्स्टाग्राम (Instagram) हॅंडलवर शेअर केले आहेत.जे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. खरं तर, सबा आझादने हृतिक रोशनसोबत पॅरिस व्हेकेशनमध्ये स्वादिष्ट जेवणाचा आनंद घेतला, ज्याचे फोटो आणि व्हिडीओ तिने इन्स्टाग्राम हॅंडलवर शेअर केले. त्यानंतर हृतिक रोशनची पहिली पत्नी सुजैन खानने (Sussanne Khan) 'सो क्यूट' अशी कमेंट करुन दोघांवरही स्तुतीसुमने उधळली.

सबाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंकडे पाहिल्यावर असं नक्की म्हणता येईल की, पॅरिसमधल्या स्वादिष्ट जेवणावर दोघांनी मस्त ताव मारला.याआधीही सबा आझादने तिच्या पॅरिस व्हेकेशनमधील अनेक फोटो शेअर केले होते,ज्यामध्ये ती बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनसोबत एन्जॉय करताना दिसते. सबाने याआधी हृतिक रोशनसोबत काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते.ज्यामध्ये ती जॅझ नाईट एन्जॉय करताना दिसत आहे.

एका फोटोत ती लाँग ड्राईव्हचा आनंद लुटताना दिसते. या व्हिडीओमध्ये हृतिक दिसत नसला तरी तो सबासोबत नक्कीच तिथे होता, कारण सबाने शेअर केलेल्या फोटोमध्ये हृतिकला टॅग केलं आहे. हृतिक रोशन आणि सबा आझाद यांच्या डेटिंगची चर्चा अनेक दिवसांपासून सिनेवर्तुळात सुरु आहे.बॉलिवूडच्या इव्हेंटमध्ये तसेच करण जोहरच्या बर्थ डे पार्टीत माध्यमकर्मींनी त्यांच्या केमेस्ट्रीच्या छबी टिपल्या. त्यांच्या चाहत्यांनेही दोघांना एकमेकांसोबत अनेकदा स्पॉट केलं आहे. डिनर पार्टीच्या माध्यमातून ते दोघेही डेट करत असतात, अशाही चर्चा आहेत. परंतु, त्यांच्या रिलेशनशीपबाबत दोघांनीही अद्यापही कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सांगलीत एक कोटी 11 लाखांच्या बनावट नोटांसह मुद्देमाल जप्त, पाच जणांना अटक

Rukmini Vasanth: 'कांतारा' चित्रपटात आपल्या दमदार अभियनाने प्रेक्षकांना भुरळ घालणारी अभिनेत्री कोण?

Laughing Benefits: हसल्याने आरोग्याला कोणकोणते फायदे होतात माहितीये का?

Maharashtra Politics : शरद पवारांना धक्का, विश्वासू सहकाऱ्यांने केला अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुंग्या किती वेळ झोपतात माहितीये का? वेळ ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

SCROLL FOR NEXT