Russian Actress Polina Menshikh Death Saam Tv
मनोरंजन बातम्या

Russia Ukraine War: लाईव्ह शोमध्ये अभिनेत्रीचा मृत्यू, सैनिकांसाठी परफॉर्म करताना युक्रेनने केला हल्ला; धक्कादायक VIDEO आला समोर

Russian Actress Polina Menshikh Death After Ukrainian Attack: युक्रेनने केलेल्या हल्ल्यात रशियाच्या अभिनेत्रीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

Priya More

Russia Ukraine War Update:

रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या 21 महिन्यांपासून युद्ध (Russia Ukraine War) सुरू आहे. या दोन्ही देशांमधील युद्ध थांबायचे नाव घेत नाहीये. हे युद्ध संपण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही. दोन्ही देशांकडून सतत हल्ले सुरू आहेत. यामध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू होत आहे. अशामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. युक्रेनने केलेल्या हल्ल्यात रशियाच्या अभिनेत्रीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, रशियातील डोनेस्तकच्या स्टारोबिशेव्हस्की जिल्ह्यातील कुमाचोवो गावात ही अभिनेत्री रशियन सैनिकांसाठी परफॉर्मन्स करत होती. कार्यक्रम सुरू असताना अचानक युक्रेनने मिसाइल हल्ला केला. या हल्ल्यात अभिनेत्रीचा मृत्यू झाला. पोलिना मेनशिख (actress polina menshikh) असं या मृत्यू झालेल्या ४० वर्षीय अभिनेत्रीचे नाव आहे.

युक्रेनने ज्या ठिकाणी हल्ला केला ते ठिकाण रशियन-नियंत्रित क्षेत्र असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे. अभिनेत्री पोलिना मेनशिख काम करत असलेल्या रशियन थिएटरशी संबंधित लोकांनी तिच्या मृत्यूची माहिती दिली. डॉनबास प्रदेशात पोलिना मेनशिख सैनिकांसाठी स्टेजवर परफॉर्म करत होती. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सैन्य आपल्या मोबाइलमध्ये याचा व्हिडीओ शूट करत होते. त्याच दरम्यान युक्रेनकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला. हा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

एजन्सीनुसार, रशियन अभिनेत्रीचा युक्रेनच्या हल्ल्यात मृत्यू झाला. 19 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली होती. युक्रेनच्या हल्ल्यात आपला जीव गमावलेली अभिनेत्री पोलिना मेनशिख ही नृत्यदिग्दर्शक, नाटककार आणि एथनिक डान्स थिएटर 'नेझेन' आणि स्टुडिओ थिएटर लेज आर्टिस्टची दिग्दर्शिका होती. दरम्यान, युक्रेनच्या हल्ल्यात एका रशियन पत्रकाराचाही मृत्यू झाला होता. बोरिस मकसुडोव्ह असं या पत्रकाराचे नाव होते. तो सरकारी-रशिया-24 टीव्ही वृत्तवाहिनीसाठी काम करणारत होता. दक्षिण युक्रेनच्या रशियन व्याप्त झापोरोझ्ये भागात युक्रेनने केलेल्या ड्रोन हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT