युक्रेनच्या 87 लष्करी तळांवर हवाई हल्ला, 500 युक्रेन सैनिक ठार, रशियाचा दावा

गेल्या 2 महिन्यांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धात दोन्ही देशांनी आतापर्यंत अनेक सैनिक आणि स्थानिक नागरिकांचा बळी गेला आहे.
Russia-Ukraine War
Russia-Ukraine WarSaam Tv

गेल्या 2 महिन्यांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धात दोन्ही देशांनी आतापर्यंत अनेक सैनिक आणि स्थानिक नागरिकांचा बळी गेला आहे. मात्र, त्यानंतरही युद्ध संपलेले नाही. त्याचवेळी रशियाने काल रात्री युक्रेनचे 500 सैनिक मारल्याचा दावा केला आहे. रशियन न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, रशियन हवाई दलाने रात्रीच्या वेळी युक्रेनियन लष्कराच्या 87 लष्करी तळांना लक्ष्य केले आहे. या हल्ल्यात युक्रेनचे 500 सैनिक मारले गेले आहेत. मात्र, युक्रेनने अद्याप या हल्ल्याला दुजोरा दिलेला नाही.

तर, डोनेस्तक भागात सोमवारी रशियन गोळीबारात चार जण ठार आणि नऊ जण जखमी झाले. तेथील गव्हर्नर यांनी, पावलो किरिलेन्को यांनी मेसेजिंग अॅप टेलिग्रामला सांगितले की, पीडितांपैकी दोन मुले आहेत, एक 9 वर्षांची मुलगी आणि एक 14 वर्षांचा मुलगा आहे.

Russia-Ukraine War
Photos: कियारा आडवाणीचा सिझलिंग हॉट लूक वाढवतोय पारा...

लुहान्स्क प्रदेशाचे गव्हर्नर सेर्ही हैदाई यांनी सांगितले की, रशियाने गेल्या 24 तासांत 17 वेळा नागरिकांवर गोळीबार झाला आहे. यामध्ये पोपस्ना, लिसिचांस्क आणि गिरस्के या शहरांना सर्वाधिक फटका बसलेला आहे. हैदाई यांनी मंगळवारी टेलिग्रामवर सांगितले की, "पॉपसनाला चार शक्तिशाली हल्ल्यांचा सामना करावा लागला आणि लिसिचान्स्कला दोनचा सामना करावा लागला आहे." लिसिचांस्क येथील दोन घरे, पोपस्ना येथील दोन, गिरस्के येथील एका घराचे नुकसान झाले.

हे देखील पहा-

रशियाने युक्रेनला तिसऱ्या महायुद्धाला चिथावणी दिल्याचा आरोप;

दुसरीकडे, मॉस्कोच्या सर्वोच्च मुत्सद्द्याने युक्रेनला तिसरे महायुद्ध भडकवण्याविरुद्ध चेतावणी दिली आणि सांगितले की अण्वस्त्र संघर्षाच्या धोक्याला कमी लेखू नये. तर, अमेरिकेने याच दरम्यान युक्रेनला आणखी शस्त्रे देण्याची घोषणा केली. महत्वाचे म्हणजे, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांना तसेच संरक्षण मंत्र्यांसह कीवला भेट दिल्यानंतर एक दिवसानंतर रशिया अयशस्वी झाल्याचे घोषित केले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com