Rukhsar Rehman to end 13 years of Marriage Instagram @rukhsarrehman
मनोरंजन बातम्या

Rukhsar Rehman-Faruk Kabir Divorce : हा निर्णय अजिबात सोपा नाही... रुखसार रहमानचा लग्नाच्या १३ वर्षांनी घेणार घटस्फोट

Rukhsar Rehman : रुखसार रहमान आणि फारुख कबीर यांनी 2010 मध्ये लग्न केले होते.

Pooja Dange

Rukhsar Rehman to end 13 years of Marriage : सरकार, पीके आणि उरी यांसारख्या चित्रपटात दिसलेली अभिनेत्री रुखसार रहमानविषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. वृत्तांनुसार, रुखसार आणि दिग्दर्शक-निर्माता फारुख कबीर यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी आल्या आहेत.

त्यामुळे दोघेही त्यांचा 13 वर्षाचा संसार मोडणार असल्याची मलाही मिळत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघेही गेल्या काही महिन्यांपासून अनेक अडचणींना तोंड देत आहेत आणि त्यांच्यातील मतभेदांवर तोडगा काढण्यात ते अपयशी ठरले आहेत. (Latest Entertainment News)

रुखसार रहमान आणि फारुख कबीर यांनी 2010 मध्ये लग्न केले होते. फेब्रुवारी 2023 पासून ते वेगळे झाल्याची माहिती आहे. मात्र, रुखसार आणि फारुख यांनी विभक्त होण्याचा निर्णय का घेतला, यावर या दोघांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. तसेच घटस्फोटाच्या वृत्तावरही ठोस शिक्कामोर्तब झालेले नाही. (Celebrity)

मात्र, एका मीडिया रिपोर्टनुसार, रुखसार रहमानने फारुख कबीर यांच्याशी झालेल्या संवादात घटस्फोटाची पुष्टी केली. रुखसार म्हणाली, 'हो, आम्ही वेगळे झालो आहोत. आम्ही फेब्रुवारीपासून वेगळे राहत आहोत आणि घटस्फोट घेणार आहोत.

सध्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे, त्यामुळे मी सविस्तर सांगू शकत नाही. माझ्यासाठी हा निर्णय अजिबात सोपा नव्हता. घटस्फोट घेण्यामागे कारण काय आहे, मला त्याच्या खोलात जायचे नाही, मला ते गलिच्छ करायचे नाही.'

घटस्फोटावर फारुख कबीर म्हणाले, 'मी खूप प्रायव्हेट व्यक्ती आहे आणि ही वैयक्तिक बाब आहे. मला आत्ता त्याबद्दल बोलायचे नाही.

रुखसार रहमान आणि फारुख कबीरबद्दल बोलायचे झाले तर दोघांनीही एकमेकांना सहा वर्षे डेट केल्यानंतर २०१० मध्ये लग्न केले. रुखसार रहमानचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी तिचे लग्न असद अहमदशी झाले होते, अभिनेत्रीला आयशा अहमद ही मुलगी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT